कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावातील लिलाव झालेल्या मालमत्तेतील झाडांचे हापूस आंबे सर्वसामान्य व्यक्तींना फुकट वाटण्यात आले आहेत. या गाव परिसरात अजूनही दाऊदचे नाते संबंधी असल्याचे बोलले जातं. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याची खेड तालुक्यातील मुंबके या गावातील असलेली प्रॉपर्टी शासनाकडून लिलावात विकण्यात आली होती. खेड तालुक्यातील मुंबके येथील प्रॉपर्टी लिलावात विकत घेतल्यानंतर या प्रॉपर्टीच्या जागेत असलेल्या बागेतील आंबे पहिल्यांदाच चक्क अनेकांना फुकट वाटण्यात आले आहेत. दाऊद इब्राहिम याच्या बागेत काही हापूस आंब्याची कलमे आहेत.. त्या बागेतील उत्पन्न आपल्यासाठी न घेता सर्वसामान्य लोकांना त्या आंब्यांची चव चाखता यावी यासाठी या जागेचे नवे मालक श्री. भारद्वाज यांनी लिलावात घेतलेल्या बागेतील आंबे उतरवून सर्वसामान्य व्यक्तींना भेट दिले आहेत.
भारद्वाज म्हणाले की, आपण ही प्रॉपर्टी आणि आंब्याची बाग पैसे कमवण्यासाठी घेतली नाही, तर चुकीचे काम करणाऱ्याला कायद्याचा वचक बसावा यासाठी कुख्यात स डॉन दाऊद इब्राहिम याची प्रॉपर्टी आपण लिलावात घेतली आहे. या प्रॉपर्टीतील उत्पन्नापासून आपल्याला कोणताही नफा कमवायचा नाही तसेच कोणता गैरफायदा देखील घ्यायचा नाही. परंतु, त्या प्रॉपर्टीतील उत्पन्नातून समाज उपयोगी लोकांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. दाऊद याच्या खेड मुंबके येथील प्रॉपर्टीचा लिलाव काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. हा लिलाव ज्या भारद्वाज या व्यक्तीने घेतला त्या व्यक्तीने हे आंबे अनेकांना फुकट वाटले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या आणखी एका संपत्तीचा २०२० साली लिलाव करण्यात आला. खेड तालुदवातील रत्नागिरीतील खेड लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव झाला आहे. लोटे गावातील स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख इतक्या किमतीला ही मालमत्ता मिळवली. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला. दरम्यानं या गाव परिसरात दाऊदचे काही नाते संबंधी असल्याचे बोलले जातं.