27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunपरशुराम घाटात बाबरनेटिंग हायड्रो, रॉक बोल्टिंग

परशुराम घाटात बाबरनेटिंग हायड्रो, रॉक बोल्टिंग

भरावावर केलेले काँक्रिटीकरण खचले आणि संरक्षण भिंत कोसळली.

परशुराम घाट व कशेडी बोगद्याच्या दुतर्फा दरडी कोसळू नयेत म्हणून ‘बाबरनेटिंग हायड्रो’, ‘रॉक बोल्टिंग’ अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अलिबाग येथील कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड यांनी दिली. परशुराम घाट व नव्या कशेडी बोगद्याजवळ दरडी कोसळू नयेत म्हणून कोकण रेल्वेच्या धर्तीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या संदर्भात टीएचडीसीएल संस्थेने जागेवर जाऊन पाहणी केली होती व त्यांचा अहवाल आता राष्ट्रीय महामार्ग विभागाला प्राप्त झाला असून, परशुराम घाट व कशेडी बोगद्याच्या दुतर्फा दरडी कोसळून नयेत म्हणून ‘बाबरनेटिंग हायड्रो’, ‘रॉक बोल्टिंग’ आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

त्यासाठी ३८ कोर्टीच्या निविदेला देखील मंजुरी मिळाली आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी परशुराम घाट व कशेडी टनेल या भागातील दरडींचा धोका टाळण्यासाठी एका वर्षाच्या आत या उपाय योजना केल्या जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सातत्याने संरक्षक भिंती कोसळत आहेत. या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने गंभीर दखल घेतली असून, ज्याप्रमाणे परशुराम घाटातील वरच्या बाजूच्या भागातील कोसळणाऱ्या दरडींवर उपाय शोधण्यासाठी ‘टीएचडीसीएल’ (टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) या संस्थेचा सल्ला घेण्यात आला.

त्याच धर्तीवर आता परशुराम घाटातील दरीच्या बाजुकडील महामार्गाच्या सुरक्षेच्यादृष्टीने या संस्थेचा सल्ला घेतला जाणार आहे. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची टीम परशुराम घाट व कशेडी बोगद्यालगत पाहणी करणार असून, त्यांच्या अहवालानंतरच या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तोपर्यंत परशुराम घाटात तापुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती गुंड यांनी दिली.

भरावावर केलेले काँक्रिटीकरण खचले – गेली आठ-दहा दिवस सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका महामार्गाला बसला. भरावावर केलेले काँक्रिटीकरण खचले आणि संरक्षण भिंत कोसळली, असा प्राथमिक अंदाज राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढला आहे; मात्र, सातत्याने अशा घटना घडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक घोकादायक ठरू शकते, हे ध्यानी घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular