28.2 C
Ratnagiri
Sunday, July 20, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriलांजात जनतेच्या उद्रेकानंतर अधिकाऱ्यांना जाग

लांजात जनतेच्या उद्रेकानंतर अधिकाऱ्यांना जाग

कोर्लेफाटा येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठे खड्डे आणि चिखल झाला आहे.

लांजा शहरांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था, चिखलाच्या साम्राज्यामुळे आक्रमक झालेल्या शहरातील नागरिकांनी आज उड्डाणपुलाचे काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे इतरवेळी दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि ठेकेदार त्वरित घटनास्थळी आले आणि कामाच्या पूर्ततेसाठी आदेश निघाले. याबाबत महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी तातडीने पर्यायी व्यवस्था, दुतर्फा साईडपट्ट्या करण्याचे आदेश ठेकेदार ईगल कंपनी याला दिले आहेत. राजापूर प्रांताधिकारी यांनीही या घटनेची दखल घेतली असून, पाईपलाईन, गटारे आणि साईडपट्ट्या यांना पर्यायी जागा देण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

पाऊस सुरू झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने लांजा शहरात कोर्लेफाटा ते साटवली फाटा या दरम्यान रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. गटारे आणि सर्व्हिस रोड नसल्याने रस्त्यावर चिखल साचून वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कोर्लेफाटा येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठे खड्डे आणि चिखल झाला आहे. लांजा शहरातील ज्येष्ठ नागरिक बबन स्वामी, संजय बावधनकर, दाजी गडहिरे, शेखर धावणे, संदीप राज्ये यांनी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आणि साईडपट्ट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन निवरेकर यांनी महामार्ग उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली. यावर राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले, पाईपलाईन, गटारे आणि साईडपट्ट्यांचे ८० टक्के काम झाले आहे. काही ठिकाणी जागेला विरोध झाल्याने त्या ठिकाणी गटारे आणि पाईपलाईन कामाला अडथळा आला आहे. ठेकेदार कंपनीला सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular