28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeKhedखेडच्या एसटी वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ….

खेडच्या एसटी वाहकाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ….

आमरण उपोषण करण्याचा इशारा वाहक विजय सुखदेव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आगारातील वाहक विजय कचरू सुखदेव यांना कर्तव्यावर असताना फुरुस येथे दोन तरुणांनी म ारहाण केली होती. याबाबत वाहक सुखदेव यांनी तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखलपात्र गुन्हा दाखल करून वाहकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या प्रकारामुळे कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा वाहक विजय सुखदेव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

६ जून रोजी वाहक सुखदेव हे खेड-दापोली मार्गावर ड्युटी करत असताना फुरुस येथे गाडी थांबवून प्रवासी चढ उतार करून गाडीतील दयाळकर नामक तरुणांनी वाहक सुखदेव यांना शिविगाळ करून गाडीतून खाली उतरत मारहाण केली. या मारहाणीत वाहक सुखदेव यांच्या कानाच्या पडद्याला इजा झाली. यावेळी मारहाण करणाऱ्या तरुणांसोबत असणारे होमगार्ड जवान दयाळकर यांनी तू माझे काही करू शकत नाहीस असे सांगून दमदाटी करण्याचा प्रकार केला.

याबाबत वाहक सुखदेव यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल न करता केवळ एनसीआर दाखल करून घेत मारहाण करणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत वाहक सुखदेव यांच्यावरच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रताप केला आहे. आपल्यावर अन्याय झाला असून आपणाला न्याय मिळावा, अन्यथा आपण उपोषणाला बसणार असल्याचे वाहक सुखदेव यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा होमगार्ड समादेशक, पोलीस उपअधिक्षक खेड, पोलीस निरीक्षक खेड, तहसीलदार खेड यांना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular