28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

आधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी...

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeSindhudurgसीवर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणारः खा. नारायण राणे

सीवर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणारः खा. नारायण राणे

कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सीवर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार, रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार, असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. चीपी विमानतळावरून विमानांचे निविन रुट चालविणार. समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार. या ट्रेनचा सर्व आराखडा तयार आहे. त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लकरच निर्णय घेणार आहोत, असेही नारायण राणे यांनी सांगितले. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली, तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार. कोकणातील उबाठा शिवसेना संपविली, उबाठाचे सर्व आडवे झाले. आता कोकणात कोणाचे बोट शिरू देणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे. उबाठा सेनेने, आयुष्यभर मुस्लिमविरोधी काम केले. मातोश्रीवर मुस्लिम समाजाला काय बोलतात तो शब्द मी येथे उल्लेख करू शकत नाही. असे आज उद्धव मिया भाई झाले. मात्र कोकणातील मुसलमान आमच्या सोबत आहेत आणि राहतील.

भारत एक संघ राहावा म्हणून आम्ही सर्वजण मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असे नारायण राणे म्हणाले. कुडाळसह सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ आम्ही जिंकणार, असा विश्वासही यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार. पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार. सीवर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार. रोजगाराची साधने या जिल्ह्यात उभी करणार, असा विश्वास नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

चीपी विमानतळावरून विमानांचे निविन रुट चालविणार. समुद्री किनारपट्टीला ट्राय ट्रेन सुरू करणार.. या ट्रेनचा सर्व आराखडा तयार आहे. त्याचा खर्च कोणत्या माध्यमातून करावा यावर आपण लकरच निर्णय घेणार आहोत, असेही नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे म्हणाले की, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे उमेदवारी मिळाली आणि विजयासाठी सहकार्य मिळाले. त्यांचेही मनापासून आभार मानतो. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी दिवसरात्र मतदारसंघात फिरले. नीलम राणे यांनी खूप मेहनत घेतली. ठिकठिकाणी बैठका घेतल्या. त्यांचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्यांचे जे आभार मानतो. पत्रकारांचे चांगल्या बातम्या दिल्याबद्दल आभार मानतो.

माजी खासदार विनायक राऊत हे माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणाले होते स्वतःला विजय हलका झाला. मात्र त्या राऊतांना आता कळलं की की कोण हलका झाला. असो त्यांनाही दीर्घ आयुष लाभो. चांगले आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देतो. निवडणूक काळात संयमी वागलो. विरोधकांनी मला उसकावण्याचा प्रयत्न, राग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मी संयमाने घेतले त्यामुळे मला विजय मिळाला. हा विजय माझे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून मिळाला, असे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular