24.4 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeCareerBECIL मध्ये पदभरती, १२वी आणि पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

BECIL मध्ये पदभरती, १२वी आणि पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

ऑफिस असिस्टंटची २०० पदे रिक्त आहेत तर १७८ डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांवर भरती करण्यात येत आहे.

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्स्लटंट्स इंडिया लिमिटेड (BECIL)ने कार्यालय सहाय्यक म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज भरू शकतात. एकूण ३७८ पदांच्या भरतीसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बारावी आणि पदवी उत्तीर्ण सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवक-युवतींसाठी चांगली बातमी आहे. यापैकी ऑफिस असिस्टंटची २०० पदे रिक्त आहेत तर १७८ डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांवर भरती करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत २५ एप्रिल २०२२ आहे.

शैक्षणिक पात्रता –

कार्यालय सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले हवेत.

डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी इच्छुक उमेदवार १२ वी उत्तीर्ण हवा.

वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांदरम्यान असावे.

निवड प्रक्रिया –

कार्यालय सहायक पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांना टायपिंग टेस्ट द्यावी लागेल. परीक्षेसाठी उमेदवारांना अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. दोन्ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत –

सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट becil.com वर जावे. होम पेज वर दिलेल्या करियर सेक्शनमध्ये जा. नोंदणी फॉर्म (ऑनलाइन) च्या लिंक वर क्लिक करा. विचारलेली आवश्यक आणि योग्य माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाचे शुल्क भरा आणि सबमिट करा.

अधिकृत वेबसाईट www.becil.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://becilregistration.com/ या लिंकचा वापर करावा.

RELATED ARTICLES

Most Popular