27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeMaharashtraमुंबईतली बेस्ट बस, लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार

मुंबईतली बेस्ट बस, लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार

प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारावर असलेल्या मशीनवर कार्ड लावून "टॅप इन" करतील , आणि त्यानंतर पुन्हा बसमधून उतरताना "टॅप आऊट” करुन तिकीट मिळणार आहेत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतली बेस्ट बस आता लवकरच १०० टक्के इलेक्ट्रिक होणार असल्याची घोषणा आज केली आहे. बरेच महिन्यांपासून ठाकरे यांचे जास्तीत जास्त वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात यावी अशी आग्रही मागणी आहे. बेस्टचा प्रवास इलेक्ट्रिकपासून सुरू झाला आता आपण पुन्हा इलेक्ट्रिककडे आलोय. डबलडेकर बस हव्यात असा माझा आणि मुख्यमंत्री महोदयांचा कायमच आग्रह राहिलेला आहे.

या बससाठी डिजिटल कार्ड बनवण्यात आले आहे. प्रवासी बसमध्ये प्रवेश केल्यावर प्रवेशद्वारावर असलेल्या मशीनवर कार्ड लावून “टॅप इन” करतील , आणि त्यानंतर पुन्हा बसमधून उतरताना “टॅप आऊट” करुन तिकीट मिळणार आहेत. बेस्टच्या प्रत्येक बसमध्ये हे कार्ड मशीन बसवण्यात आले आहेत. “चलो” या कंपनीद्वारे हे कार्ड तयार करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. हे कार्ड केवळ शंभर रुपयांत प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. या कार्डचे अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हे कार्ड रिचार्ज करता येऊ शकतं. बेस्ट कंडक्टरकडून किंवा आगारात जाऊन १०० रुपयात कार्ड खरेदी करू शकतील.

येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ९०० इलेक्ट्रिक डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. सध्या ३३३७ बस उपलब्ध आहेत. १० हजार बसची गरज आहे. या बस १०० टक्के पर्यावरण पूरक असाव्यात, त्यातल्या सगळ्या इलेक्ट्रिक हव्यात. या सर्व बसपैकी निम्म्या बस डबल डेकर असतील अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, बेस्टमध्ये चढलं की सतत पुढे चला, पुढे चला असे म्हटलं जातं. असंच आपणही आता पुढे जात आहोत, आणि कायम पुढेच जात राहणार. पुढे जात राहणे हाच आपला मंत्र राहिला आहे. बेस्ट खरंच बेस्ट आहे, कारण पूर, कोविड काळ, बॉम्बहल्ले या सगळ्यात परिस्थितीमध्ये देखील ती न थांबता कायम कार्यरत राहिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular