22.9 C
Ratnagiri
Tuesday, March 19, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeLifestyleरमजानमधील उपवास खजूर खाऊनच का सोडला जातो !

रमजानमधील उपवास खजूर खाऊनच का सोडला जातो !

मुस्लिम बांधव ३० दिवस कडक उपवास करतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते काहीही खात किंवा पीत नाहीत.

सध्या जगभरात रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि या महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस कडक उपवास करतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते काहीही खात किंवा पीत नाहीत. प्रत्येक धर्माचे विविध सण आणि चालीरीती असतात. सध्या हवेत उष्मा सुद्धा प्रचंड वाढल्याने, या कडक उन्हाळ्यात भुकेले आणि तहानलेले राहणे कठीण होते, परंतु अल्लावरच्या असणाऱ्या श्रद्धेमुळे प्रामाणिकपणे लोक उपवास ठेवतात आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर इफ्तारी खाऊन उपवास सोडतात.

इफ्तारीत अनेक प्रकारचे पदार्थ बनविले जातात. परंतु, उपवास सोडताना यामध्ये मुख्य म्हणजे खजूराचा समावेश करण्यात आला आहे आणि खजूर खाऊन आपला उपवास सोडला जातो. परंतु खजूर खाऊनच उपवास का सोडला जातो या बद्दल खास कारण जाणून घेऊया.

खजूर खाल्ल्याने उपवास सोडण्यामागे एक श्रद्धा अशी आहे की खजूर हे फळ इस्लामचे शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद यांचे आवडते होते. ते कायम खजूर खाऊनच उपवास सोडत असत. म्हणूनच मुस्लिम बांधव आजही ही परंपरा तंतोतंत पाळतात. हा श्रद्धेचा भाग झाला परंतु, याला शास्त्रीय दृष्ट्या देखील महत्व आहे.

दिवसभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला ऊर्जेची कमी निर्माण होते, त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असते. खजूरामध्ये पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे शरीराला आवश्यक फायबर देखील मिळतात. मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्वे, लोह आणि प्रथिने यामुळे शरीर सक्रिय राहते. खजूर हे असे अन्न आहे की जेवल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा प्राप्त होते. या शिवाय खजूर खाल्ल्याने इफ्तारच्या वेळी खाल्लेल्या इतर गोष्टी देखील व्यवस्थित पचतात आणि पचनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. खजूर पचण्यास हलके असतात त्यामुळे ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला काही इजा अथवा हानी पोहोचत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular