28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeLifestyleकोरोना काळातील एक शक्तिवर्धक पेय

कोरोना काळातील एक शक्तिवर्धक पेय

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज एक शक्तीवर्धक पेय पाहूया थोडक्यात.

जगामध्ये कोरोनाचा विळखा एवढा घट्ट आवळत चालला आहे कि, जेवढ आपण स्वतची आणि कुटुंबाची काळजी घेऊ तेवढी कमीच आहे. पण आत्ताचा काळ असा बनला आहे कि, जमेल तेवढे आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे बनले आहे. एक घर आड सर्वच घरांमध्ये कोविड पेशंट सापडत आहे. त्यामुळे जेवढे सुरक्षित राहता येईल तेवढे राहावे. त्यामध्ये जरी घराबाहेर जाता येत नसले तरी, अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत संयम राखून कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करायचा आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूपगरजेचे आहे. सोशल मिडीयावर रोज एक ना अनेक लेख, वेगवेगळे उपाय, अनेक रेमेडीज असे पोस्ट येत असतात. वाढत्या कोरोनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली तर आपण या कोरोना काळातही सुरक्षितपणे निरोगी राहू शकतो. काहीवेळा सभोवतालची परिस्थिती पाहता, नैराश्य येते. मनाचा परिणाम शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज एक शक्तीवर्धक पेय पाहूया थोडक्यात.

manuka drink as immunity booster

ड्रायफ्रूटस सगळ्यांना आवडतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण त्याचा वापर करत असतो. पन काही वेळेला असे होते कि, आपण सर्व पदार्थ ग्रहण करतो पण त्याचा नेमका उपयोग आपल्याला माहितच नसतो. मनुके आपल शरीर निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचा असा घटक आहे. मनुके बनविण्याची प्रक्रिया म्हणजे द्राक्ष सुकवून त्याचे मनुके तयार होतात. मनुक्यामध्ये विविध प्रकारची प्रोटीन्स, जीवनसत्वे असतात, जी आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आपली सुटका करण्यासाठी प्रभावी ठरतात. तसेच सकाळी अनुशापोटी मनुक्याचे पाणी पिण्याने आपल्या शरीरास बर्‍याच प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते. विशेषत: मनुक्याचे पाण्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

हे मनुक्याचे पाणी कसे तयार करावे, ही सुद्धा एक सोप्पी पद्धती आहे. हे मनुक्याचे पाणी तयार करण्यासाठी फक्त दोन कप पाणी आणि 150 ग्रॅम मनुकाची आवश्यकता भासणार आहे. एका भांड्यात पूर्णपणे पाणी उकळून घेऊन त्यामध्ये धुवून मनुका घालायच्या आणि रात्रभर त्या तशाच पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी हे पाणी मोठ्या आचेवर पुन्हा एकदा उकळवावे आणि असे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने खूप फायदे होतात. परंतु, हे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तास इतर काहीही खाणे पिणे कटाक्षाने टाळावे. या पाण्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता उत्तम बनून कोरोनाच काय इतरही कोणत्याही आजारावर मात करायला शरीर तयार राहते.

manuka drink as immunity booster

रोज सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात जमा होणारे आणि नको असलेले हानिकारक घटक शरीरातून मूत्र आणि विष्टेच्या द्वारे निघून जातेत. तसेच या पाण्याने यकृताची क्षमता वाढून चयापचय नीट होते, शरीरातील रक्त साफ होण्यास देखील मदत होते. मनुकामध्ये असलेल्या बोरॉन आणि कॅल्शियम मुळे हाडे तयार आणि मजबूत होण्यास मदत होते. अशाप्रकारे हे पेय नक्कीच शरीरासाठी उपयोक्त असून त्याचे रोज सेवन करण्यास विसरू नये .

RELATED ARTICLES

Most Popular