27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeIndiaप्लाझ्मा थेरपीचा वापर मर्यादित

प्लाझ्मा थेरपीचा वापर मर्यादित

केंद्र सरकारने कोरोना व्हायरसवरील उपचार पद्धती बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना सुरु झाल्याच्या काळापासून कोरोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा अवलंब केला जात होता. प्लाझ्मा डोनर म्हणजे नेमके कोण याबाबतची माहिती या कोरोनाच्या काळामध्ये सर्वज्ञात आहे. ज्या लोकांना कोविड संक्रमण होऊन ते बरे होऊन ३ महिन्या नंतर प्लाझमाचे दान करू शकतात. त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारक क्षमता निर्माण झालेली असते. परंतु, केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने कोरोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याचे आदेश दिले आहेत. कारण प्रौढ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा हवा तेवढा फरक पडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लाझ्मा पद्धतीसंबंधी टास्क फोर्सकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. आता पर्यंत कोरोनाच्या उपचारपद्धतीध्ये प्लाझ्मा थेरपीचा उपयोग चान्ल्या प्रकारे झाल्याच्या दिसल्याने शासनाने त्याला परवानगी दिली होती. परंतु, आता केवळ कोरोनाची लागण झाल्याच्या सुरुवातीच्या टप्याला म्हणजेच लक्षणे जाणवल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या आतमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. परंतु, आता प्लाझ्मा थेरपीला कोरोना उपचारांमधून वगळण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतला आहे.

आयसीएमआर, एम्स दिल्ली आणि इतर संबधीतांशी चर्चा केल्यानंतर कोरोना उपचारावर नवी नियमावली जाहीर केली गेली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी कोरोना उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सोशल मिडियावर प्लाझ्मा दान करण्यासाठीही बर्याच प्रमाणात मेसेजेस व्हायरल होताना दिसत होते. परंतु, वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी सर्वच वयाच्या रूग्णांवर परिमाणकारक नसल्याचं अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मागील शुक्रवारी आयसीएमआर आणि कोरोन टास्क फोर्सची याबाबतीतली बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये सर्वांनुमते प्रौढ रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारपद्धती मधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसेच काही वैज्ञानिकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्रव्यवहारही करण्यात आला होता.

भारतामध्ये प्लाझ्मा पद्धतीचा वापर हा अवैज्ञानिकपणे आणि सर्वांसाठीच केला जात आहे. प्लाझ्मासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनामध्ये प्लाझ्मा उपचार पद्धतीचा सर्व प्रकारच्या, वयाच्या रुग्णावर कोणताही चांगला परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. तरीही भारतातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर प्लाझ्मा चढवून सर्हास उपचार करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधीच एक तर सर्वत्र असलेले लॉकडाऊन, आणि त्यात प्लाझ्मा डोनर शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी फरफट, त्यामुळे अधिक प्रमाणात त्रास होत आहे, असे या पत्रात म्हटले होते आणि सध्या ज्या प्रकारे प्लाझ्मा उपचार केले जातात त्या प्लाझ्मा उपचार पद्धतीमुळे कोरोनाचा विषाणूचे अति घातक रूप तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्लाझमा डोनरची मागणी जास्त प्रमाणात वाढली आहे. जे लोक कोरोनामधून बरे झालेले आहेत त्या लोकांना ३ महिन्यांनंतर प्लाज्मा डोनेट करण्याचं आवाहन केल जात आहे. कारण कोविड-१९ च्या लक्षण दिसल्यावर ७ दिवसांच्या आत प्लाज्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. पण या थेरपीने किती फरक पडतो याचे पुरावे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नंतर असा निर्णय घेण्यात आला आहे की ट्रीटमेंट प्रोटोकॉलमधून प्लाज्मा थेरपीला वगळण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular