25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedभोस्ते घाटात, अवघड वळणावर एलपीजी गॅस टँकर पलटी

भोस्ते घाटात, अवघड वळणावर एलपीजी गॅस टँकर पलटी

टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

महामार्गावर अपघातांच्या घटना घडणे, सुरूच आहे. एका पाठोपाठ एक अशा विविध घाट रस्त्यांवर मोठ्या वाहनांचे अपघात घडून आल्याने, वाहतुकीचा तर खोळंबा होतोच. तर काही प्रमाणात जीवितहानी देखील घडते आहे. वेरळ येथे एकाच ठिकाणी झालेल्या अपघाताला दोन दिवस उलटले नाहीत तर, मुंबई-गोवा महामार्गावर दुसर्या भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने परिसरातील गावात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अवघड वळणावर एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. टँकर पलटल्यानंतर त्यातून गॅस गळती होऊ लागल्याने खेड पोलिसांनी घाट दोन्ही बाजूंनी तात्काळ बंद केला आहे. घाट बंद झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सतत होणारे अपघात आणि होणाऱ्या वाहतूक खोळंब्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत.

पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करत वाहतूक रोखली आहे. भोस्ते घाट बंद झाल्यामुळे घाटाला पर्याय मार्ग असणाऱ्या वेरळ- कोंडीवली-शिव मार्गे बोरज या पर्यायी मार्गावरून लहान वाहने जात आहेत. तर मोठी वाहने महामार्गावरतीच अडकून पडली आहेत. घाटातील वाहतूक सुरू होण्यास किती वेळ लागेल याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान भोस्ते घाट हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून काही दिवसांपूर्वी देखील तिथे एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटला होता. त्यामुळे त्या घाट रस्त्यावरून जाताना एक प्रकारे भीती निर्माण होते.

RELATED ARTICLES

Most Popular