20.9 C
Ratnagiri
Wednesday, January 7, 2026

मॅरेथॉन उपक्रमामध्ये मराठीचा वापर – प्रसाद देवस्थळी

कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या तिसऱ्या वर्षी मराठी भाषेचा...

कोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

कोंडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेली घंटागाडी तब्बल सात...

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघसंवर्धनाला गती…

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा...
HomeKhedन्यू मांडवे धरणासाठी भूमिपुत्र आक्रमक २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा

न्यू मांडवे धरणासाठी भूमिपुत्र आक्रमक २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा

मागील तीन वर्षांपासून ही फाईल वित्त विभागात अडकून पडली आहे.

खेडमध्ये न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्प गेली कित्येक वर्ष रखडला असून सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रकल्प मार्गी लागत नसल्याने जल फाउंडेशनने आक्रमक प्रवित्रा घेतला आहे. २६ जानेवारीला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा या सभेत घेण्यात आला आहे. खेड तालुक्यातील न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला किंजळे तर्फे नातू, घोगरे, दहिवली, शिंगरी, पुरे, मांडवे आणि तळे या गावांतील मोठ्या संख्येने भूमिपुत्र उपस्थित होते… या सभेच्या सुरुवातीला रवींद्र निकम यांनी भुमिका स्पष्ट केली. नितीन जाधव यांनी आतापर्यंत धरणासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. की, २६ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषण केल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली आणि प्रकल्पाची फाईल वेगाने पुढे गेली. मात्र मागील तीन वर्षांपासून ही फाईल वित्त विभागात अडकून पडली आहे.

या विलंबामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत नितीन जाधव यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी उपस्थितांना एक महिन्याचा वेळ देत सांगितले की, या काळात सर्वांनी एकत्र येऊन शासनाकडे पाठपुरावा करावा. सभेत उपस्थित भूमिपुत्रांनी धरण पूर्ण होणे, योग्य पुनर्वसन व वाढीव मोबदला या मागण्या ठामपणे म ांडल्या. आपण आतापर्यंत संघटित न झाल्याची चूक मान्य करत, आता एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातील प्रतिनिधींम धून न्यू मांडवे धरण कोअर कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी नितीन जाधव यांनी सांगितले की, तुमच्या हातात एक महिना आहे. या कालावधीत जे काही करता येईल, ते करा. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम असून तो निर्णय मागे घेणार नाही, अशी भूमि का जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केली.

न्यू मांडवे धरणप्रश्नी २६ जानेवारी रोजी आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका ग्रामस्थांसमवेत झालेल्या सभेत मांडली. ४१ वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाकडे लक्ष वेधण्यासाठी जल फाऊंडेशन अध्यक्ष नितीन जाधव यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. धरण प्रकल्पाची आवश्यक कागदपत्रांची फाईल अजूनही लाल फितीतच अड़कून पडली आहे. प्रकल्पाच्या फाईलचे घोंगडे नेमके कुठे अडले आहे आणि विलंबाचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची प्रकल्पस्थळी महत्वपूर्ण सभा पार पडली.

RELATED ARTICLES

Most Popular