25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriसोनवी पुलावर मोठे खड्डे, गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

सोनवी पुलावर मोठे खड्डे, गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची मागणी

आरवली ते बावनदी दरम्यान अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोनवी पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसात खड्यात पाणी साचल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हे सर्व खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, अशी प्रवाशांसह स्थानिकांनी केली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाची आरवली ते बावनदी दरम्यान अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक मंदावत असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे.

गणेशोत्सवदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या कंपन्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू केली गेली नाही. संगमेश्वर बस स्थानकाजवळ आणि सोनवी पुलावर रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तेथून जाताना वाहने कासव गतीने पुढे सरकतात. एखादे वाहन भरधाव आल्यास येथे मोठा अपघाताची भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या मार्गावर छोटे मोठे अपघातही घडत आहेत. संगमेश्वर बसस्थानकाजवळील नवीन पुलाचे काम सुरू असताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे वाहन चालकांचे मत आहे.

गणेशोत्सवापूर्वी सोनवी पुलासह आरवली ते बावनदी दरम्यान पडलेले सर्व खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात येत असतात. खड्डयांचा अंदाज न आल्याने चाकरमान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. अपघाताचेही धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालकांनी तसेच पादचाऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular