24.9 C
Ratnagiri
Saturday, October 25, 2025

कळंबस्ते येथे खड्ड्यात फटाके वाजवून दिवाळी…

चिपळूण तालुक्यातील रस्ते विकासासाठी आणलेला निधी पावसाच्या...

रत्नागिरीत शिवसेना युतीसाठी आग्रही; भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार

रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच महायुतीच्या...

परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान…

यंदा दिवाळीचा उत्साह असतानाच, परतीच्या पावसाने सावंतवाडीसह...
HomeMaharashtraशिवसेना कोणाची? याचा निकाल येताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ

शिवसेना कोणाची? याचा निकाल येताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ

जर योग्य निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकेल.

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. हा निकाल एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागणारच नाही, असा ठाम दावा मोठी कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी केला असून या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होताना पहायला मिळेल, असा दावादेखील अॅड. सरोदे यांनी एका प्रसिध्द वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. सन २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे, असा निकाल दिला. या निकालाला उध्दव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या पण हे प्रकरण प्रलंबित राहिलं. आता शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरु होते आहे. दरम्यान यांबाबत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे.

असीम सरोदे काय म्हणाले? – वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहचली आहे. न्यायाला उशीर होणं हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यम ातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असं मला वाटतं.

उध्दव ठाकरेंच्या विरोधात… – उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर न्यायालयाने द्यावा अशी माझी मागणी आहे, असे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर काय? हा प्रश्रच काल्पनिक आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझंच म्हणणं नाही ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतं ते कुणीही हेच सांगतील. एकनाथ शिंदेंचा प्रवास ज्यांना कळला आहे त्यांनाही हे माहीत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करुन अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदही भूषविलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागू शकतो, असा ठाम दावा कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी या मुलाखतीत केला आहे.

धनुष्यबाणाशिवाय निवडणुका… – अॅड. असीम सरोदे यांनी पुढे सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तरी न्यायालयाने निकाल दिला पाहिजे. खरंतर एकनाथ शिंदेंनी न्यायालयात जाऊन सांगितलं पाहिजे की या प्रकरणाचा निकाल द्या. जर निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला की धनुष्यबाण विरहित निवडणुका एकनाथ शिंदेंनी जिंकून दाखवाव्यात असं आव्हानच असीम सरोदे यांनी दिलं आहे.

मोठी उलथापालथ – जर योग्य निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकेल. जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे भाजपाच्या गोटात जातील का? असा प्रश्न विचारला असता अॅड. असीम सरोदे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे भाजपात दाखल झाले आहेतच. शिवसेनेतील फूट राजकीय कारणासाठी वापरण्यासाठी त्यांचं अस्तित्व कायम ठेवलं आहे. जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात निकाल लागला तर त्वरित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह काही लोकांना भाजपात घेतलं जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक मोठी राजकीय उलथापालथ महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसू शकते, असंही असीम सरोदे म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular