19.6 C
Ratnagiri
Sunday, November 16, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhed'भगवानदास' कोकरे बुवा गोरक्षक की गोभक्षक, नेमके काय?

‘भगवानदास’ कोकरे बुवा गोरक्षक की गोभक्षक, नेमके काय?

पैसे कमावण्यासाठी त्याने जे काही केले ते पाहून थक्क व्हायला होते.

दुसन्या पीडीत अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या तक्रारी नुसार आज भगवान कोकरे बुवाला अटक झाली व त्याला पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने ३१ ऑक्टो. पर्यंत कस्टडी सुनावली. भगवान कोकरे मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसीच्या जागेत अनधिकृतपणे गोशाळा चालवित आहे. कोकरे युवा स्वतःला गोरक्षक म्हणवून घेत असला तरी तो गोरक्षक की गोभक्षक असा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा मागील काही काळापासून या साऱ्या परिसरातील जनतेत सुरु आहे. भगवान कोकरे युवा निराधार गायी व वासरे फुकटात गोशाळेत आणत असे आणि खाटीकांना भरभक्कम मोबदला घेऊन विकत असे तसेच जनावरांची वासलात लावली जात होती चर्चा या साऱ्या परिसरातील जनतेत मागील काही काळापासून सुरु आहे.. याची कसून चौकशी व्हावी आणि दुध का दुध व पानी का पानी’ होऊन जाऊ द्या अशी चर्चा लोटे दशक्रोशीतील संतप्त ग्रामस्थांमध्ये खुलेआम सुरु आहे.. हे जर खरे असेल तर ते भयावह असेच म्हणावे लागेल!. प्रत्यक्ष भगवान परशुरामाच्या भूमीतच सारे घडले हे तर त्याहून भयावह होय! असे सांगतात की कोकरे बुवाचे अनेक प्रकारचे विविध उद्योग धंदे होते. पैसे कमावण्यासाठी त्याने जे काही केले ते पाहून थक्क व्हायला होते.

गोसदृश्य प्राण्याचे मुंडके – याबाबत लोटे, पेढे परशुराम, निगडे, बोरज, भरणा नाका या साऱ्या परिसरातील जनतेत मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. या संदर्भात एक घटना घडली आणि ग्रामस्थांना नेमके काय चालले आहे याचा सुगावा लागला. मौजे निगडे व बोरज या दोन गावांच्या मध्ये मुंबई – गोवा महामार्गावर एक टोल नाका आहे. मध्यंतरी या टोल नाक्याच्या जवळ एका शेतात गो सदृश्य प्राण्याचे मुंडके व काही हाडे सापडली.. हा हा म्हणता साऱ्या दशक्रोशीत खळबळ उडाली.. कोकरे बुवाच्या गोशाळेपासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर हे घडले.

मोठ्या मनाचे ग्रामस्थ – मौजे निगडे परिसरात मोरे कुटुंबियांची मोठी वस्ती आहे तसेच मौजे बोरजमध्ये शिंदे व घोसाळकर कुटुंबियांची फार मोठी वस्ती आहे. तेथे शिंदे वाडी व घोसाळकर वाडी आहे. हे सर्व ग्रामस्थ शिकले सवरलेले व उच्च विद्याविभूषित असून खाऊन पिऊन सुखी संपन्न आहेत. सारे जण गायीला परम पवित्र मानणारे आहेत. गायीची कत्तल सोडा किंवा गाय वयस्कर झाली म्हणून खाटीकाला ‘देणे सोडा उलट अखेरपर्यंत ही मंडळी गायीला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळतात, अशी सारी मोठ्या मनाची मंडळी आहेत.

मुंडक्याचे कानात बिल्ला – अशा स्थितीत मौजे निगडे व मौजे बोरज या मधील शेतात मध्यंतरी गो सदृश्य प्राण्याचे मुंडके व काही हाडे सापडल्याचे वृत्त येऊन थडकले आणि मग साऱ्या दशक्रोशीतील जनता हे काय घडले ते पाहण्यास धावली.. एकच गर्दी उसळली.. त्या गो सदृश्य प्राण्याच्या मुंडक्याची सखोल पाहणी झाली तेव्हा त्या मुंडक्याचे कानात एक बिल्ला टोचलेला आढळून आला.. हा – बिल्ला या कोकरे बुवाच्या तथाकथित – गोशाळेचा होता.. आणि मग एकच हलकल्लोळ उडाला.. त्यावेळी हे वृत्त मुंबई पासून साऱ्या कोकणात पसरले.. त्याची चर्चा आजही जनतेत ठायी ठायी ऐकावयास मिळते.

जनता सर्व काही जाणते ! – एवढे सारे झाल्यावर पुढील सोपस्कार पार पडले. परंतु पुढे काहीच झाले नाही.. सारे शांत शांत.. चिडीचूप.. कुणी ‘ब्र’ काढला तरी धम कावण्या.. त्यामुळे काही काळानंतर सर्वत्र निरव शांतता पसरली.. आजही ग्रामस्थ खाजगीत चर्चा करताना ‘मांडवली झाली’ असे दबक्या आवाजात सांगतात.. यातच सर्व काही आले.. आता खेड्या पाड्यातील ग्रामस्थ देखील शिकले सवरले असून त्यांना कुणी कितीही प्रयत्न केला तरी सर्व काही समजते.. जनता विलक्षण सुज्ञ असून ती सर्व काही जाणते हेच खरे !

सीआयडी चौकशी करा ! – अशा स्थितीत जे घडले त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, सीआयडी किंवा सीबीआय कडून चौकशी झाली पाहिजे.. तरच वस्तुस्थिती जनतेसमोर येईल.. अशी खुलेआम चर्चा आता जनतेत सर्वत्र सुरु आहे. कोकरे बुवा रस्त्यावर फिरणारी उनाड गुरे किंवा निराधार गुरे व वासरे फुकटात आणत असे आणि खाटीकांना जबर किंमत घेऊन विकत असे किंवा वासलात लावली जात असे.. अशी संतप्त चर्चा जनतेत खुलेआम सुरु आहे.. म्हणूनच याची सीआयडी किंवा सीबीआय चौकशी व्हावी म्हणजे सारे काही चव्हाट्यावर येईल असे मत जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular