28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeEntertainmentसलमान खानचा ५७ वा वाढदिवस जोशात साजरा

सलमान खानचा ५७ वा वाढदिवस जोशात साजरा

पार्टीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या संगीता बिजलानीनेही ग्रँड एन्ट्री घेतली

२७ डिसेंबरला सलमान खान त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने काल रात्री भाईजानची बहीण अर्पिता खानच्या घरी मिडनाईट बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. जिथे शाहरुख खान, युलिया वंतूर, तब्बू, सोनाक्षी, कार्तिक आर्यन, जेनेलिया डिसूजा, रितेश देशमुख, सुनील शेट्टी, अंगद बेदी आणि पूजा हेगडे यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. भाईजानच्या वाढदिवसाच्या रात्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहेत.

सलमानने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत हाय सिक्युरिटीसह भव्य एन्ट्री घेतली. यादरम्यान त्यांनी मीडियासमोर पोझही दिली. भाईजान आपला वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर साजरा करत असला तरी यावेळी त्याची बहीण अर्पिता खानच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

भाईजानच्या वाढदिवसाच्या पार्टीचे खास आकर्षण शाहरुख खान होता. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख कारमधून खाली उतरताना दिसत आहे. एवढेच नाही तर तो भाईजानला मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सलमान-शाहरुख दोघेही ब्लॅक लूकमध्ये खूपच हँडसम दिसत आहेत.

पार्टीत सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या संगीता बिजलानीनेही ग्रँड एन्ट्री घेतली. यादरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि सलमानने त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. निळ्या रंगाच्या शिमर आउटफिटमध्ये संगीता खूपच सुंदर दिसत होती. संगीता आणि सलमान दोघांनीही १० वर्षे एकमेकांना डेट केले असले तरी हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आल्याचे समजते, मात्र सोमी अलीशी जवळीक निर्माण झाल्याने हे नाते तुटले. हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडिया यूजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘पहिले प्रेम नेहमीच पहिले असते’. तर आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘माझे पहिले पहिले प्रेम’.

RELATED ARTICLES

Most Popular