मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या असून, तथागत गौतम बुद्धांनी दिलेली नीतीसूत्रे अंगिकारली तर खऱ्या अर्थाने समाजातील अंध:कार दूर होईल असे म्हटले आहे. तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणतात की, आजच्या अनेक सामाजिक समस्यांतून बाहेर यायचे असेल तर गौतम बुद्धांची विचारसरणी मार्गदर्शक आहे. मनुष्यजातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेली नीतीसूत्रे संपूर्ण विश्वाचे कल्याण करतील.
आपल्यातील भेदाभेद, विषमता नष्ट करणारा समतेचा त्यांचा उपदेश आपण स्वीकारून वाटचाल केली तर तीच खरी मानवता असेल. आज समाजात हिंसाचार, विकृती, युद्घजन्य स्थिती वाढली आहे. या विकारांवर गौतम बुद्धांचा क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश आपणा सर्वांना मार्ग दाखवणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.
बुद्ध पौर्णिमा हि केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या दिमाखात साजरी केली जाते. गौतम बुद्धांचे विचार सर्व जगभरात पसरले आहेत. त्यांच्या विषयीच्या अनेक कथा आपल्याला परिचित आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा तिथी १५ मे रोजी मध्यरात्री १२.४५ पासून सुरू होऊन ती सोमवार, १६ मे रोजी रात्री ९.४३ पर्यंत चालेल. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा १६ मे रोजी साजरी केली जाणार आहे.
पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मित्र सुदामा याला गरिबी आणि दु:खातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते, अशी मान्यता आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते. धर्मराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची चिंता राहत नाही, असे सांगितले जाते.
त्याचप्रमाणे आज यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज १६ मे रोजी होणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. भारतामध्ये तेंव्हा दिवस असल्याने ते दिसून येणार नाही आहे. या दिवशी विशाखा नक्षत्र आहे. त्यामुळे या चंद्रग्रहणात एक विशेष योग तयार होत आहे. ज्याचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल. ग्रहण जरी अशुभ मानले जात असले जाते.