26.8 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeDapoliगाडी बाजूला काढ  म्हटल्याच्या रागातून, हर्णेत दोघांवर कोयतीने हल्ला

गाडी बाजूला काढ  म्हटल्याच्या रागातून, हर्णेत दोघांवर कोयतीने हल्ला

जिल्ह्यातील दापोली हर्णे समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावरून पुण्यातील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली आहे. लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे समुद्र किनारी वर्दळ मोठ्याच प्रमाणात वाढली आहे. विविध भागातून, जिल्ह्यातून पर्यटक दाखल होत असल्याने पार्किंग देखील अपुरी पडत आहे.

जिल्ह्यातील दापोली हर्णे समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावरून पुण्यातील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले.या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. शुभम परदेशी वय २९, सूरज काळे वय २५ अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील रहिवाशी आहेत. तेथून निघताना गाडीच्या हे वाद निर्माण झाले आहेत.

हर्णे समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये पिंपरी चिंचवड येथील हे पाच पर्यटक थांबले होते. मात्र आज ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याच वेळी सुराली गार्डन जवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला काढ  असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला. शुभम परदेशी, सूरज काळे या हल्ल्यात चांगलेच जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीचे देखील नुकसान करत, काचही फोडण्यात आली.

या घटनेनंतर पुण्यातील या दोन पर्यटकांनी झालेल्या अचानक हल्ल्यातून वाचून, पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.  या दोन्ही पर्यटकांवर खुनी हल्ला करणारे सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे दापोली तालुक्यातील सुसंस्कृत पर्यटनाला गालबोट लागले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular