28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

कोकणच्या समुद्रात पाकिस्तानची बोट, सर्व यंत्रणा सतर्क

कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट...

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...
HomeRatnagiriकोकण किनारपट्टीवर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतो बंपर सौंदाळ…

कोकण किनारपट्टीवर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडतो बंपर सौंदाळ…

एका नौकेला किमान १ टनाहून अधिक सौंदाळा मिळत आहे.

वातावरणातील बदलांचा सामना करत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांना बंपर सौंदाळा मासा मिळत आहे. त्यामुळे मिरकरवाडा जेटीवर सौंदाळा मासा खरेदी करण्यासाठी खवय्ये सरसावले आहेत. किलोला ७० ते ७५ रुपये दर मिळत असून मासे मिळणाऱ्या मच्छीमारांमध्ये समाधान जात आहे. व्यक्त केले गेले काही दिवस कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांची अडचण होत आहे. समुद्र खवळलेला असल्याने काही नौका किनाऱ्यावर उभ्या आहेत. एकीकडे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांची ही स्थिती असतानाच पर्ससीननेट, ट्रॉलरद्वारे मासेमारी करणाऱ्यांना जयगडपासून खोल समुद्रात बंपर सौंदाळा मासा जाळ्यात सापडत आहे.

गेल्या काही वर्षांत हा मासा कमी प्रमाणात मिळत होता. यंदा मोठ्या प्रमाणात मासा मिळत असल्याने बहुसंख्य मच्छीमार जयगड पट्ट्यात मासेमारीसाठी सरसावलेले आहेत. स्थानिकांसह हर्णै, मुंबईतील नौकाही या परिसरात मासेमारीसाठी जाळी टाकून आहेत. हा मासा खाण्यासाठी चविष्ट असल्याचे अनेक खवय्यांचे म्हणणे आहे. गेले चार दिवस मिरकरवाडा, राजिवडा येथील जेटीवर सौंदाळा, बांगडा हे मासे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मध्यम आकाराचा सौंदाळा ७० ते ७५ रुपये किलो, तर छोट्या आकाराचा सौंदाळा ४० ते ५० रुपये किलोने जेटीवर मिळत आहेत.

एका नौकेला किमान १ टनाहून अधिक सौंदाळा मिळत आहे. त्यामुळे मच्छिमारांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. त्यामधून एका फेरीला सुमारे ४० ते ७५ हजार रुपयांची बेगमी होत आहे. दरम्यान, सौंदाळा मासा काही नौकांनाच मिळत असल्याचे मच्छीमारांकडून सांगितले जात आहे. शंभर नौकांमध्ये दहाच नौका भाग्यशाली ठरत आहेत. हा मासा आठवड्यातून एकदाच मिळत असल्याने मोठा नफा या माध्यमातून होत नसल्याचे अनेकांचे मत आहे.

गिलनेटवाल्यांना अच्छे दिनची प्रतीक्षा – गेले महिनाभर कोकण किनारपट्टीवर अनियमित पाऊस सुरू आहे. अधूनमधून वातावरण खराब होत असल्यामुळे त्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसत आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना शांत बसावे लागत आहे. अजून त्यांचे अच्छे दिन आलेले नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular