24.7 C
Ratnagiri
Monday, February 16, 2026

संगमेश्वर तालुक्यात जंगलतोड कोसुंबमध्ये लाकडाचा साठा

गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड...

काजिर्डा घाटरस्ता, सर्वेक्षणाला चालना एक कोटीची तरतूद

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

कोकण कन्या पाठोपाठ मांडवी एक्सप्रेसही खोळंबल्याने दादर स्थानकावर प्रवाशांचा संताप

मुंबईच्या दिशेने येणारी 'कोकण कन्या एक्सप्रेस' मार्गात...
HomeRatnagiriरत्नागिरीत व्यावसायिकाची ३६ लाखांची फसवणूक

रत्नागिरीत व्यावसायिकाची ३६ लाखांची फसवणूक

फिर्यादी यांची फेसबुकवर सुहानी शर्मा नावाच्या एका महिलेशी ओळख झाली.

कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एका व्यावसायिकाला ३६ लाख ६४ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरजोळे एमआयडीसी परिसरातील एका दुकान मालकाची ‘क्रिप्टो करन्सी’च्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. सुहानी शर्मा (रा. कलकत्ता) व डॅनियल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही.) असे संशयित आहेत. ही घटना २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दुपारी मिरजोळे एमआयडीसी येथे घडली. फेब्रुवारी फिर्यादी यांची फेसबुकवर सुहानी शर्मा नावाच्या एका महिलेशी ओळख झाली. सुहानीने त्यांचा विश्वास संपादन केला आणि तिचा मित्र डॅनियल हा कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक असल्याचे सांगितले.

डॅनियलने फिर्यादींना व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून ते अॅप लॉगिन करण्यास भाग पाडले. संशयितांनी फिर्यादींना ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादींचा विश्वास जिंकून त्यांना वेळोवेळी पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यांनी ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये गुंतवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन – अनोळखी व्यक्तींनी सोशल मीडियावर दिलेल्या गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी अॅपमध्ये पैसे गुंतवू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन नंबर १९३०वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular