24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriमिऱ्या ये नाम ही काफी है! गाव वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; एमआयडीसीला विरोध

मिऱ्या ये नाम ही काफी है! गाव वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; एमआयडीसीला विरोध

या गावांमधील ७५ टक्क्‌यापेक्षा जास्त जमिनीत औद्योगिक प्रकल्प होणार आहे.

समस्त मिऱ्यावासीयांनो आपला मिऱ्या वाचवा!! स्वर्गासारखी आपली भूमी, नरक होण्यापासून वाचवा !! मिरकरांची ताकद म्हणजे आपला म्हसोबा, तो वाचवा!! आई नवलाई पावणाई सारख्या, जागृत देवस्थानाचा, आपल्यावर कोप होण्यापासून, स्वतः ला वाचवा !! मिऱ्या ये नाम ही काफी है! कुठला रे तू? मिऱ्या वरचा ! म्हटलं की समोरचा गारच होतो. हा अनुभव सगळ्यांना आहे, अशी आपली ओळख संपवायला निघालेल्या राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी अवघा मिऱ्या दणाणला. एमआयडीसीचा विषय कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी दिनांक २ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता अलावा, बस स्टॉप येथे सहकुटुंब एकत्रित यावे, असें आवाहन करण्यात आले.

आमच्या निसर्गरम्य गावची धुळधाण आम्ही होवू देणार नाही, असे म्हणत शुक्रवारी जाकिमिऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत औद्योगिक क्षेत्रास विरोधाचा ठराव प्रशासनाकडून आलेल्या नोटीसांसंदर्भात ग्रामस्थ एकाचवेळी हरकती दाखल करतील. आमुच्या गावात औद्योगिक क्षेत्र नकोच, असाही निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. जाकिमिऱ्या ग्रामपंचायतीमध्ये १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेचे शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी आयोजन केले होते. रत्नागिरी शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि तीनही बाजूने समुद्राने वेढलेल्या मिऱ्या गावतील ७५ टक्क्याहून अधिक जमीन आता औद्योगिक महामंडळ म्हणून विकसित करावी, अशी अधिसूचना काढली आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीसा घेवून ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामसभेला हजर होते. सरपंच आकांक्षा कीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक माने उपस्थित होते. अर्धी जमीन औद्योगिक क्षेत्र व उरलेली जमीन समुद्री महामार्गाच्या नावाखाली हस्तांतरित केली जात आहे. पर्यावरणसंपन्न गावात पर्यावरणावर आधारित उद्योगास चालना देण्याऐवजी औद्योगिक त्रास आमचा विरोध आहे. मच्छिमार म्हणून आयुष्य काढलेल्यांनी स्थलांतरानंतर नक्की कुठे आणि कसं जगायचं, असा प्रश्न ग्रामस्थांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला.

कोकण विकासाच्या नावाखाली कोकणातील निसर्गसुंदर गाव उध्वस्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या यादीत आता रत्नागिरी शहरानजिकच्या मौजे मिऱ्या (सडामिऱ्या) आणि जाकिमिऱ्या या दोन्ही गावांचा समावेश आहे. या गावांमधील ७५ टक्क्‌यापेक्षा जास्त जमिनीत औद्योगिक प्रकल्प होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular