गुरूवारी प्रॉपल्शन मॉड्यूल लॅण्डर आणि रोहरपासून यान वेगळे झाले. आता लँडर विक्रम चंद्रावर लँड होण्यासाठी एकटेच प्रवास करेल. भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह विक्रम साराभाई यांच्या नावाने लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे.. साराभाई यांना आज गर्व होत असेल. प्रॉपल्शन मॉड्यलने लँडर विक्रमला त्याच्या योग्य ठिकाणी पोहोचवले. जेव्हा प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडर विक्रम वेगळे झाले त्यानंतर इस्त्रोने ट्रिट करून ही माहिती दिली. इस्रोने लँडर विक्रम कडून प्रॉपल्शन मॉड्यूलचे आभार व्यक्त केले.
इस्त्रोने “Thanks for the ride, mate! असे ट्विट केले. इस्त्रोने दुपारी १ वाजता प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळं करण्याची कामगिरी पूर्ण केली. दरम्यान यानंतर विक्रम लँडर गोलाकार कक्षेत फिरणार नाही. ते पुन्हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. यानंतर, ८ आणि २० ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंगद्वारे, विक्रम लँडर ३० किमी पेरील्युन आणि १०० किमी अपोलून कक्षेत ठेवले जाईल.
अवघे काही अंतर दूर – पेरील्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर, तर अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर. परंतु इंधन, चंद्रावरील वातावरण, वेग इत्यादींवर अवलंबून या कक्षेत किरकोळ फरक असू शकतो. पण याचा मोहिमेवर काही फरक पडणार नाही. पण एकदा ३० किमी १०० किमीची कक्षा गाठल्यानंतर इस्रोसाठीसर्वात कठीण टप्पा सुरू होईल. तो म्हणजे म्हणजे सॉफ्ट लँडिंग. ३० किमी अंतरावर आल्यानंतर विक्रम लँडरचा वेग कमी होईल. चांद्रयान-३ धीम्या गतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल. हा सर्वात कठीण टप्पा असेल.
काही काळासाठी थ्रस्टर सुरू – चांद्रयान वर्तुळाकार अशा कक्षेत फिरत होते. ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर १५३ कि.मी. आणि कमाल अंतर १६३ कि.मी. होते. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वा.च्या सुमारास इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यानाचे थ्रस्टर काही काळासाठी सुरू केले. त्यानंतर हे यान १५३.कि.मी. X १६३ कि.मी. जवळपास वर्तुळाकार कक्षेत आले होते.
काय होणार प्रॉपल्शन मॉड्यूलचे… – गेल्या १ महिना ३ दिवसांपासून प्रॉपल्शन मॉड्यूलच्या पाठीवर लँडर विक्रम होता. या दोघांची मैत्री श्रीहरिकोटा येथून सुरू झाली आणि दोघांनी एकत्र चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासात मग कक्षा बदलायची असो की मार्ग बदलायचा असो दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. पृथ्वीची कक्षा सोडण्याचे असो की चंद्राची गुरुत्वाकर्षण कक्षा पकडणे असो हा सर्व प्रवास मॉड्यूल आणि लँडर यांनी यशस्वीपणे केला. आता देखील जेव्हा लँडरपासून वेगळे होण्याची वेळ आली तेव्हा ही प्रक्रियादेखील ठरल्याप्रमाणे पार पाडली.
२३ ऑगस्टकडे लक्ष – लँडरला यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने सोडल्यानंतर आता प्रॉपल्शन मॉड्यूल अंतराळात गायब होईल. दुसरीकडे लँडर विक्रम चंद्राच्या जमीनीकडे रवाना झाले आहे. आता सर्वांना प्रतिक्षा असेल ती २३ आणि २४ ऑगस्टची जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले जाईल.