27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...
HomeMaharashtraभारत-पाकमध्ये युद्धविराम मात्र हल्ला झाल्यास चोख उत्तर

भारत-पाकमध्ये युद्धविराम मात्र हल्ला झाल्यास चोख उत्तर

अमेरिकेने 'मध्यस्थी केल्याचा दावा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताने युद्धविरामाला म्हणजेच शस्त्रसंधीला मान्यता दिली. भारताचे परराष्ट्र -सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या विनंतीवरुन भारताने सैनिक कारवाई थांबविली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या महासंचालकांमध्ये चर्चा झाली. पाकिस्तानच्या लष्करी महासंचालकांचा (डीजीएमओ) भारताच्या डीजीएमओंना फोन आला होता. त्यामध्ये उभय देशांनी युद्धविराम मान्य केला.

अखेर युद्धविराम – दोन्ही बाजुंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4 वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सुरू असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही. मिल्ट्री कारवाई होणार नाही. जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही. दोन्ही बाजूंकडून याबाबत एकमेकांच्या लष्कराला सुचना देण्यात आल्या आहेत. असे असले तरी दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत.

अमेरिकेची मध्यस्थी – दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेल्या युद्धविराम साठी अमेरिकेने ‘मध्यस्थी केल्याचा दावा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. शुक्रवारी रात्रीपासून अमेरिका मध्यस्थी करत होती. ट्रम्प यांचे भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलणे सुरू होते. अखेर ही मध्यस्थी सफल झाली. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे ट्विट प्रेसिडंट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

पाकिस्तानकडूनही शस्त्रीसंधी – पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनीदेखील सोशल मिडियावर याबाबतची माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तानने तत्काळ शस्त्रसंधी म्हणजेच युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने कायमच शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular