लोटे एमआयडीसी मध्ये प्रदूषणाचा प्रकोप झाला आहे. कोतवली गावानजीक रासायनिक सांडपाण्याची पाईप लाईन फुटली. यामुळे वशिष्ठी खाडीत मोठे जल प्रदूषण झाले आहे. यामुळे मच्छिमार भोई समाज आक्रमक बनला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन कोतवली गावानजीक वाशिष्टी खाडीत फुटल्याने, खाडीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले. पाईप लाईन फुटल्याने रासायनिक सांडपाणी खाडीच्या पाण्यात मिसळले आणी मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होऊन खाडीतील मासे देखील मेले. खाडीतील पाणी दूषित झाल्याने स्थानिक मासेमारी करणारा भोई समाज आक्रमक झाला आहे. मोठ्या प्रमाणात मासे मेल्याने मासेमारीवर चालणारे त्यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतर एमआयडीसीचे अभियंते यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असून फुटलेली. जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

