26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeSportsमुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सलामीसाठी डेव्हन कॉनवे आणि राचिन रवींद्र यांची निवड निश्चित आहे.

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीलाच लढत आहेत. घरच्या मैदानावर होणाऱ्या या लढतीत चेन्नईचा संघ मुंबईसमोर फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची शक्यता आहे. लिलावातून आपल्या संघात पुन्हा घेणाऱ्या आर. अश्विनसह नूर अहमद, श्रेयस गोपाल, दीपक हुडा, रवींद्र जडेजा आणि राचिन रवींद्र असा फिरतीचा ताफा चेन्नईकडे आहे. आपल्या फिरकीची ही ताकद लक्षात घेऊन चेन्नईने घरच्या मैदानावर फिरकीस पोषक असे वातावरण तयार केले आहे, त्यामुळे उद्याच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी मुंबईसह इतर संघांनाही हे आव्हान असणार आहे. दुसऱ्या बाजूला विश्वविख्यात आणि खेळपट्टी कशी असली तरी मॅचविनर जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमुळे मुंबईची वेगवान गोलंदाजी काहीशी कमजोर वाटत आहे. सध्या तरी आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांस बुमरा मुकण्याची शक्यता आहे.

हे अगोदरच माहीत असल्यामुळे मुंबई संघाने तशी मानसिकता तयार करून इतर पर्याय तयार केले आहेत. एकीकडे बुमराची अनुपस्थिती आणि त्यातच मुख्य कर्णधार हार्दिक पंड्यावर या पहिल्या सामन्यासाठी असलेली बंदी असे दुहेरी संकट मुंबईवर आहे. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव आहेच. त्याच्या साथीला क्रिकेट विश्वातील सध्याचा प्रमुख कर्णधार रोहित शर्माही आहे; पण हार्दिककडे असलेली अष्टपैलूत्व मुंबईला महत्त्वाचे ठरू शकले असते. गुणवान परदेशी खेळाडू असल्यामुळे चेन्नईसमोर त्यातील चार खेळाडू निवडण्याचे आव्हान चेन्नईसमोर असेल. सलामीसाठी डेव्हन कॉनवे आणि राचिन रवींद्र यांची निवड निश्चित आहे.

वेगवान गोलंदाजीत पथिरानाला प्राधान्य असेल; मात्र चौथा परदेशी खेळाडू म्हणून कोणाला पसंती द्यायची, यासाठी धोनी आणि कंपनीला मेहनत घ्यावी लागेल. फलंदाजीत मुंबईची ताकद भारी आहे. ईशान किशनला संघात कायम ठेवले नसले तरी रोहित शर्माचा सलामीला साथीदार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा य ष्टिरक्षक फलंदाज रायन रिकल्टन असेल त्यानंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा असे एकापेक्षा एक सरस आक्रमक फलंदाज आहेत. बुमराच्या अनुपस्थितीत मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त ट्रेंट बोल्टवर असेल. त्याच्या साथीला पूर्वाश्रमीचा चेन्नईचा दीपक चहर असेल. रिस टोपले आणि कॉब्रिन बॉश असे परदेशी खेळाडूंमधील पर्याय असतील. तर फिरकी गोलंदाजी न्यूझीलंडचा कर्णधार आणि पूर्वाश्रमीचा चेन्नईचा मिचेल सँटनर तसेच कर्ण शर्मा आणि मुजीब उर रहमान यांच्यावर अवलंबून असेल.

संघ चेन्नई : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, डेव्हन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शैक रशीद, राचिन रवींद्र, आर. अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, मतीषा पथिरान

मुंबई : सूर्यकुमार यादव (कर्णधार), रोहित शर्मा, रायन रिकल्टन (य. ष्टिरक्षक), तिलक वर्मा, मनन धीर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मास, दीपक चहर, मुजीब उर रहमान (हार्दिक पंड्या या सामन्यासाठी अनुपलब्ध)

रोहित शर्माकडे लक्ष – भारताला नुकताच चॅम्पियन्स करंडक जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळी करून आपली तादक आणि क्षमता दाखवून दिली आहे. पूर्वीचाच रोहित शर्मा दिसून आला होता. या आयपीएलमध्येही तो अशीच धडाकेबाज फलंदाजी करणार, याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular