33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRajapurसोमवारी मुख्यमंत्र्यांची राजापुरात जाहीर सभा

सोमवारी मुख्यमंत्र्यांची राजापुरात जाहीर सभा

मुख्यमंत्री या मतदारसंघातूनच शिवसंकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा महायुतीच्या उमेदवारावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद सुरु असतानाच सोमवारी ८ जानेवारीला राजापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असल्याने ते याबाबत काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. शिवसंकल्प अभियानाच्या ‘निमित्ताने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या २ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ही सभा होणार असून या निमित्ताने शिवसेना मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता आहे. या तिन्ही पक्षातील कार्यकत्यांमध्ये महायुतीचा योग्य तो संदेश जावा या भूमिकेतून येत्या १४ जानेवारीला साऱ्या राज्यात जिल्हास्तरावर महायुतीच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी मुंबईत या तिन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून केली होती. या शिवसेनेच्यावतीने मेळाव्यांसोबतच शिवसंकल्प अभियानदेखील सुरु होत असून या अभियानांतर्गत सोमवारी ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांची राजापुरात सभा होते आहे.

सध्या राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे आमदार आहेत. या मतदारसंघावर राजन साळवी आणि ठाकरे गटाची पकड आहे. मुख्यमंत्री या मतदारसंघातूनच शिवसंकल्प अभियानाला सुरुवात करणार आहेत. एका अर्थाने ठाकरेंच्या गडात शिंदेंचे शक्तीप्रदर्शन अशा भूमि केतून या सभेकडे पाहिले जात आहे. त्यासाठीच राजापूर मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळे या सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे, राजकीय प्रश्नांवर मुख्यमंत्री निश्चितचं बोलतील. त्याचसोबत राजापुरात सध्या कळीचा मुद्दा ठरलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलतात याविषयीदेखील उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular