26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeChiplunचिपळूण महापूरासंदर्भात मोडक समितीचा अहवाल सादर

चिपळूण महापूरासंदर्भात मोडक समितीचा अहवाल सादर

कोळकेवाडी धरणातून विसर्ग झालेले पाणी या पुरासाठी कारणीभूत ठरले नसल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.

मागील वर्षी चिपळूण मध्ये ओढावलेली महापूराची परिस्थिती लक्षात घेता, अशी परिस्थिती उद्भवण्यास त्यावेळेस मुसळधार पाऊस हे महत्त्वाचे कारण असले तरी शहरात वाढलेली लोकवस्ती, मोकळ्या जागांवर झालेले अतिक्रमण, नदीपात्रालगतची खोदकाम, बांधकामे, जमीन सपाटीकरण आणि सुधारणा यासाठी निरनिराळ्या ठिकाणी टाकलेले भराव ही देखील प्रमुख कारणे असल्याचा अहवाल मोडक समितीने शासनाला सादर केला आहे.

चिपळूण शहरात गेल्या वर्षी जुलैमध्ये आलेल्या महापूराची नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रमुख अभियंता दीपक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली. या अभ्यासगटाने सरकारला अहवाल सादर केला आहे. कोळकेवाडी धरणातून विसर्ग झालेले पाणी या पुरासाठी कारणीभूत ठरले नसल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये सतत सुरू असलेली जंगलतोड आणि त्यामुळे होणारी डोंगरदऱ्यांची धूप याचा फटका चिपळूण शहराला बसत असून, या परिसरात येणाऱ्या पुराचे हे अप्रत्यक्ष कारण असल्याचे अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

सततच्या वृक्षतोडीमुळे जंगलांची तोड करण्यात आल्याने जमिनीची धूप होऊन डोंगर कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील आणि सपाटीवरील भागात विकास प्रकल्पांसाठी, खाणप्रकल्प, महामार्ग, रेल्वे जंगलतोडीसाठी वाहतुकीसाठी केले जाणारे रस्ते इत्यादीसाठी होणारे खोदकामही यास कारणीभूत असल्याचे अभ्यासगटाने स्पष्ट केले आहे.

भविष्यात निळ्या आणि लाल रेषांची आखणी झाल्यानंतर कोणतीही बांधकामे करताना निरनिराळ्या खात्यांच्या समन्वयाने ही बांधकामे करणे अपेक्षित आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत पुन्हा तेवढ्याच पटीत नदीपात्रात गाळ साठण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular