30.3 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeMaharashtraउद्धव ठाकरेंच्या मेळाव्याबाबत विरोधी पक्षांच्या टीका

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याबाबत विरोधी पक्षांच्या टीका

उद्धव ठाकरे यांनी १ मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबईमध्ये बुधवारी शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचारही घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलीच टीका केली आहे. मात्र यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी १ मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नितेश राणे उद्धव ठाकरेंचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? अशा भाषेत कॅप्शन देत व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

या मेळाव्यामध्ये खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची व्यासपीठावर राखीव ठेवण्यात आली होती. यामुळं व्यासपीठानं सर्वाचं लक्ष प्रथम वेधून घेतलं. सेनेच्या कोणत्याही कृत्यावर विरोधी पक्ष कायमच टपलेले असतात, हि राउतांची रिकामी खुर्ची बघून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधाला आहे. रिकाम्या खुर्चीवरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या गटनेत्यांना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत गिधाडांना लचका तोडू देऊ नका अस आवाहन केलं आहे. मुंबईतील नेस्को सभागृहात काल शिवसेनेचा मेळाव्यात ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजच सांगतो. एक लक्षात घ्या मृत्यूमध्ये फरक कसा असतो. मी गिधाड हा शब्द का वापरला हे लक्षात घ्या. कारण मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिधाड कुठे असतात?  मुंबई ही तुमच्यासाठी केवळ विकण्यासाठी स्वेअर फुटाची जमीन असेल पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular