29.1 C
Ratnagiri
Wednesday, February 5, 2025

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र येणार?

राज्याच्या राजकारणात याआधी अनेकवेळा उध्दव आणि राज...
HomeChiplunचिपळूण-पनवेल मेमू ट्रेन प्रवाशांनी हाऊसफुल्ल

चिपळूण-पनवेल मेमू ट्रेन प्रवाशांनी हाऊसफुल्ल

काही प्रवाशांना लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठावी लागली.

सलग सुट्यांमुळे परतीच्या प्रवासात रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण मार्गावर सोमवारी चिपळूण-पनवेल व पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशलची वाढीव फेरी चालवण्यात आली. यातील चिपळूण-पनवेलच अनारक्षित मेमू स्पेशलची फेरी हाऊसफुल्ल धावली. काही प्रवाशांना लोंबकळत प्रवास करत मुंबई गाठावी लागली. कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणाऱ्या गर्दीमुळे कोकणातील प्रवाशांना आतमध्ये जागा मिळवताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. गावाहून मुंबईकडे जाण्यासाठी कोकणवासियांना आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या रत्नागिरी-दिवा, मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी-दिवा या मोजक्याच गाड्या आहेत.

या तीनही रेल्वेगाड्या नियमितपणे विक्रमी गर्दनिच धावत असल्याने गाड्यांमधून प्रवाशांना रेटारेटीचा प्रवास करावा लागतो. विशेषतः सुट्टीच्या दिवशी प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेशच मिळत नसल्याने “बऱ्याचवेळा आल्यापावली माघारी परतावे लागते. या पार्श्वभूमीवर गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी कोकण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने फक्त रविवारीच चिपळूण-पनवेल व पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्यात येत आहे. या मेमू स्पेशलला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद देखील लाभत आहे.

सोमवारी वाढीव फेरी – ‘विकेंड ‘मुळे रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशलची सोमवारी वाढीव फेरी चालवण्याचा निर्णय कोकण व मध्य रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशी कमालीचे सुखावले. परतीच्या प्रवासात चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल विक्रमी गर्दीनच धावल्याने रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीत तितकीच भर पडली.

RELATED ARTICLES

Most Popular