28.3 C
Ratnagiri
Thursday, April 18, 2024

अवकाळी पावसाची दापोलीत हजेरी

दापोली शहरासह तालुक्यात काल (ता.१५) रात्री अवकाळी...

कोकणची संस्कृती टिकवली विनायक राऊत

माझ्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी गेल्या ३९...
HomeDapoliबिबट्याचा दिवसाढवळ्या वावर, करावा लागतोय जीवघेणा प्रवास

बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर, करावा लागतोय जीवघेणा प्रवास

२०१८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र पहिल्याच पावसात ते निकृष्ट दर्जाचे असल्याने उखडले.

महामार्गाची दयनीय अवस्था आणि त्यांची सुरु असणारी डागडुजी संपण्याचे नावच घेत नाही आहे. दापोली तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यापैकी एक असलेला वाकवली-उन्हवरे या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे पुढे गावात जाताना वाहनचालकांना साखलोळीमार्गे जावे लागत आहे. हा रस्ता सुस्थितीत आहे पण त्यावर बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर असतो. या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या अनेकांना बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. परंतु, नाईलाजास्तव अशा धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

२०१८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र पहिल्याच पावसात ते निकृष्ट दर्जाचे असल्याने उखडले. त्यामुळे ग्रामस्थांनी दापोली उपअभियंता कार्यालयात धडक दिली. वर्षभरात ठेकेदाराने परत काम केले, मात्र ते वर्षभरात परत परिस्थिती जैसे थे. वाकवली-उन्हवरे हा रस्ता दाभीळ पांगारी, उन्हवरे, भडवळे या तिन्ही मार्गांचा मध्यबिंदू असल्याने तसेच याच मार्गावर मराठा दरबार, पन्हाळेकाजी लेणी, उन्हवरे गरम पाण्याचे कुंड ही पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर नेहमी रहदारी असते. २०१८ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण झालेले काही कालावधीतच उखडले.पण या रस्त्याकडे कोणत्याही राजकीय नेत्याने लक्ष दिलेले नाही.

त्यामुळे हा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरला असून या रस्त्यावर प्रवास करण्यास वाहकांना तिथून वाहतूक करणे खूपच कठीण बनत आहे. यास पर्याय म्हणून गावतळे, साखलोळी, साखलोळी नं. १ यामार्गे दापोली हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला रस्ता अजूनही बऱ्या‍पैकी स्थितीत आहे. पर्याय म्हणून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर गेल्या दोन वर्षांत सुमारे ८ दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला केला. अनेकानी बिबट्याला या रस्त्यावर वावरताना पाहिले असून अनेकवेळा वनविभागाने साखलोळीसह दोन गावांमध्ये असलेल्या जंगलमय भागात गस्त वाढविली होती.

साखलोळी मार्गावरील रस्ताच्या कडेला वनविभागाने बिबट्यापासून सावध रहा असे फलक लावले आहेत. केवळ वाकवली-उन्हावरे रस्ता निकृष्ट दर्जाचा व खड्डेमय झाल्याने नाईलाजास्तव बिबट्याच्या दहशतीखाली अनेक दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular