26.1 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeChiplunसुप्रसिद्ध पवन तलाव सध्या वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत

सुप्रसिद्ध पवन तलाव सध्या वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत

मैत्री पशुकल्याण संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे आढळून आली

चिपळूण शहरातील सुप्रसिद्ध पवन तलाव सध्या वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. शालेय तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा तिथे घेतल्या जात असत. परंतु, काही विकृत लोकांनी तिथे सतत दारू आणि सिगरेटच्या पार्ट्या करून तेथील दर्जाला गालबोट लावले आहे.

विविध मैदानी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले पवन तलाव मैदान सध्या काही विकृत मानसिकतेमुळे बदनाम होऊ लागले आहे. या मैदानाच्या गॅलरी भागातील इमारतीला अनेकांनी आपला दारूचा अड्डाच बनवला आहे. मैत्री पशुकल्याण संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे आढळून आली असून असे कृत्य करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

मैत्री पशुकल्याण संस्थेच्या सदस्यांनी पवन तलाव मैदान परिसरातील त्या इमारतीत साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नगरपालिकेने ही इमारत मैत्री पशुकल्याण संस्थेला जखमी भटक्या प्राण्यांचे उपचार तसेच तात्पुरता निवाऱ्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. चिपळूणमधील काही बेशिस्त नागरिक दारू पिणे, सिगारेट ओढणे यासाठी या इमारतीचा गैरवापर करत असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले आहे. मात्र या परिसराला दारूचा अड्डाच केल्याने त्याचा त्रास संस्थेला होऊ लागला आहे. परिसरातील अनेक जागृत आणि सुजाण नागरिक अनेकदा या दारू पिणाऱ्या मंडळींबद्दल तक्रारी केल्या असून देखील ती मंडळी तिथेच अड्डा बनवून असतात. त्यामुळे पोलिस व नगर पालिका प्रशासनाने अशा लोकांवर वॉच ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular