25.6 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरी शहराला मिळतोय आधुनिक साज, पालकमंत्री सामंतांचे प्रयत्न

रत्नागिरी शहराला मिळतोय आधुनिक साज, पालकमंत्री सामंतांचे प्रयत्न

ही सगळी विकासकामे पूर्ण करताना रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत.

रत्नागिरी शहराला आधुनिक साज देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. १५ ऑगस्टला टिळक जन्मस्थानाचे लोकार्पण, आर्ट गॅलरी सुशोभीकरण, ई-वाहन वितरण, एक मेगावॅट क्षमतेचा गोळप येथील सौरऊर्जा प्रकल्प यांसह विविध विकासकामांची उ‌द्घाटन आणि भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते होणार आहेत. अनेक नावीन्यपूर्ण बदलांमुळे रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहरात आणखीन काही महत्त्वपूर्ण कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.

पालकमंत्री सामंत या निमित्ताने ते वचनपूर्तीही करणार आहेत. इंजिनियरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, संस्कृत विद्यापीठ, टिकळ ग्रंथालय, तारांगण, मारूती मंदिर शिवसृष्टी पूर्णत्वास गेली आहेत. आता उपविभागीय अधिकारी रत्नागिरी कार्यालयाचे भूमिपूजन, मनोरुग्णालय इमारतीचे बळकटीकरण व सुशोभीकरण विकासकामाचा प्रारंभ, महिला व बालकल्याण विभागअंतर्गत चार महिला बचत प्रभागसंघांना ई-वाहन वितरण, एक मेगावॅट क्षमतेचा गोळप येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन या सगळ्या कामांची सुरवात एकाच दिवशी होणार आहे.

या पद्धतीने गतिमान कारभाराचे उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. रत्नागिरी जिल्हा अल्पावधीच प्रगतिपथावर गेला आहे. उद्योगमंत्री म्हणून काम करताना राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा कायापालट केला आहे. ही सगळी विकासकामे पूर्ण करताना रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. पावसामुळे त्यांची गती मंदावली.

RELATED ARTICLES

Most Popular