25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriरत्नागिरी शहर खड्डेमय वाहनचालक संतप्त

रत्नागिरी शहर खड्डेमय वाहनचालक संतप्त

मारुती मंदिर ते माळनाका रस्त्याची अवस्था दयनीय आहे.

एप्रिल ते मे या दोन महिन्यांत रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. साळवी स्टॉप, नाचणे, कोकणनगर या भागातील कामे पूर्ण झाली; मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात मारुती मंदिर ते माळनाकापर्यंत जुन्या रस्त्यावर काँक्रिटीकरणासाठी पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहरात दिवसाला हजारो वाहने या रस्त्यावरून फिरत असतात. त्या वाहनचालकांना खड्ड्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून वाहनचालक ‘सावधान’ पुढे खड्डे आहेत, असे म्हणत इतरांना सतर्क करत मार्गक्रमण करत आहेत. जिल्ह्यात पावसाचा जोर आहे; परंतु रत्नागिरी शहरात रस्त्यांच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. क्राँक्रिटीकरणाचा रस्ता वाहनचालकांसाठी चांगला आहे; पण उर्वरित परिसरात खड्ड्यांतून वाहने चालवताना धक्के खावे लागत आहेत. पुढील मारुती मंदिर ते माळनाका रस्त्याची अवस्था दयनीय आहे. मारुती मंदिर येथे दरवर्षी मंदिराच्या वळणावर पडणारा भला मोठा खड्डा यावर्षीही पडला. त्यामुळे वाहनचालकांना अदबीने वाहन चालवावे लागत आहे. मारुती मंदिर सर्कल ते माळनाका येथून वाहन चालवताना देवाचे नाव घेत प्रौढ वाहनचालक गाडी चालवताना दिसतात. या सगळ्याचा विचार करून पालिकेने मारुती मंदिर येथील खड्ड्यात जांभा डबर टाकला आहे; पण तोही उखडला आहे.

माळनाक्यापर्यंत स्वर्गाचे दार कधी उघडेल, अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. कोणता खड्डा चुकवावा, असा प्रश्न चालकांपुढे असतो. मारुती मंदिर ते माळनाका या रस्त्यावर वाहनचालकांनी वाहन सावकाश हाकावे, असा सल्ला दिला जात आहे. प्रशासनाकडून वेळीच याकडे लक्ष दिले असते तर ही वेळ आलीच नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस नसताना या खड्ड्यांची डागडुजी व्हावी, अशी केवळ अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular