26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeChiplunइनाम जमिनीचे भूसंपादनातील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार

इनाम जमिनीचे भूसंपादनातील ५० टक्के मोबदला कुळांना मिळणार

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

चिपळूण तालुक्यातील पेढे आणि परशुराम ही दोन गावे देवस्थान ईनामातील असुन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्रीकरणासाठी रुंदीकरणामध्ये या गावातील जमिन मोठ्याप्रमाणावर संपादीत झाली आहे. जागेच्या एकूण मोबदल्यापैकी ५० टक्के मोबदला कुळांना, १० टक्के देवस्थान समितील आणि ४० टक्के मोबदला प्रशासनाच्यानावे ठेवण्यात येईल असा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शनिवारी ही बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्र्यांसह आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, डिएसपी धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह परशुराम आणि पेढे येथील देवस्थान समितीचे पदाधिकारी व कुळ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यानी सर्वांशी चर्चा करुन मोबदल्याबाबतचा निर्णय जाहीर केला.

धरणवासीयांचे पुनर्वसन – दरम्यान तिवरे धरणग्रस्त कुटुंबियांबाबतही बैठकीत चर्चा झाली या बैठकीत १४ घरे तिवरे गावी बांधायची तर उरवरीत १९ घरे व पेढ परशुराम भुसखलनातील ७ घरांचे पुनर्वसन अशी एकूण २६ घरे ‘अलोरे येथे बांधण्याची सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना केली. या बैठकीला तिवरे ग्रामस्थदेखील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular