26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeKhedखेडमध्ये महावितरणची ८७ पदे रिक्त!

खेडमध्ये महावितरणची ८७ पदे रिक्त!

अनेक वीज कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांचा भार सोपवण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या येथील संचालन व सुव्यवस्था विभागाच्या खेड व लोटे उपविभागातील ७ कार्यालयांसाठी मंजूर १३६ पदांपैकी ८७ पदे रिक्त आहेत. ४९ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कारभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महावितरणच्या विभागीयकार्यालयामध्ये खेड, लोटे, मंडणगड, दापोली १२ उपविभागांचा समाविष्ट आहे. यातील खेड व लोटे या दोन उपविभागांतर्गत तालुक्यातील खेड, लोटे, भरणे, आंबवली, कर्जी व खोपी शाखा कार्यालयांचा समावेश आहे.

या कार्यालयांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी बहुतांशी पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वीज कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांचा भार सोपवण्यात आल्याने ग्राहकांना सेवा देताना दमछाक होत आहे. खेड उपविभागासाठी मंजूर असलेले १ गुणनियंत्रक अधिकारी व ३ निम्नस्तर लिपीक (लेखा) पद रिक्त आहे. खेड शहर शाखा कार्यालयात १ प्रधान तंत्रज्ञ पदाची रिक्त असून ७ वरिष्ठ तंत्रज्ञपैकी ३, तंत्रज्ञ ५ पदापैकी ४. खेड ग्रामीण २ साठी वरिष्ठ तंत्रज्ञ ७ पैकी ३. ग्रामीण ३ साठी वरिष्ठ तंत्रज्ञ ७ पदांपैक २ पदे रिक्त आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular