26.9 C
Ratnagiri
Sunday, July 20, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriरत्नागिरीतील जयगड किल्ल्याची स्वच्छता

रत्नागिरीतील जयगड किल्ल्याची स्वच्छता

राजा शिवछत्रपती परिवार स्थापना ३१ जुलै २०१४ रोजी झाली.

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे (महाराष्ट्र) रत्नागिरी तालुक्यातील जयगडा किल्ला येथे सफाई मोहीम राबवण्यात आली. ५६ मावळे, रणरागिणींनी यामध्ये सहभागी झाले होते. किल्ल्यावरील बुरुजावर वाढलेली झाडी, झुडपे, गवत साफ केले. या मोहिमेमुळे किल्ले जयगडवर नीटपणे फिरता येऊ लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. गड किल्ले, बांधले, देखभाल केली. आज साडेतीनशे वर्षांचा हा जाज्वल्य इतिहास आपल्याला गडांच्या माध्यमातून प्रेरणा देतो. परंतु सध्या किल्ले, गडांची दुर्दशा झालेली पाहायला मिळते. त्यामुळे राजा शिवछत्रपती परिवारातर्फे दर महिन्याला सफाई मोहीम व रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमांना मदत असे अन्य उपक्रम राबवले जातात. वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि बालगृहाला दिवाळी फराळ वाटप आणि मुलांना उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले आहे. किल्ले जयगडवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३१ मावळे, ८ बाल मावळे, १२ रणरागिणी आणि ५ बाल रणरागिणी असे एकूण ५६ जण सहभागी झालेले होते.

कळझोंडी ग्रामस्थांनीसुद्धा या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत सफाईला हातभार लावला. रत्नागिरीमध्ये गेली आठ वर्षे परिवार काम करत असून, जयगड येथे २०१६ पासून स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य चालू आहे. रत्नागिरी परिवाराने आजपर्यंत जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, नाटे येथील घेरा यशवंतगड, आंबोळगड, चिपळूणचा गोविंदगड, दापोली येथील सुवर्णदुर्ग अशा विविध ठिकाणी गडसंवर्धन मोहिमेचे यशस्वी आयोजन केले आहे. संगमेश्वर येथील पांडवकालीन पुरातन मंदिरे स्वच्छता मोहीमसुद्धा आयोजित केली होती. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. गड संवर्धन आणि शिवकार्य करण्यासाठी कोणाची इच्छा असेल, तर रत्नागिरी विभागप्रमुख दिनेश कुरटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी परिवारामार्फत करण्यात आले.

आठ वर्षे संवर्धनाचे काम – राजा शिवछत्रपती परिवार स्थापना ३१ जुलै २०१४ रोजी झाली. संस्था नोंदणीकृत असून सांगलीचे सुनील सूर्यवंशी संस्थापक आणि अध्यक्ष आशिष घोरपडे आहेत. दर महिन्याच्या एका रविवारी प्रत्येक विभागामार्फत २१ ठिकाणी गड संवर्धनाचे कार्य चालू असते. राजा शिवछत्रपती परिवाराचे महाराष्ट्रात ३२ जिल्ह्यांत मिळून २१ विभागांमध्ये कार्यरत आहे. गडसंवर्धनाचे काम स्वखर्चाने केले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular