26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriरत्नागिरीत कार्तिकी यात्रेनंतर बाजारपेठेतून उचलला सहा टन कचरा

रत्नागिरीत कार्तिकी यात्रेनंतर बाजारपेठेतून उचलला सहा टन कचरा

तब्बल ४० सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले.

कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी बाजारपेठेत भरलेल्या यात्रेवेळी तब्बल ६ टन कचरा झाला. शुक्रवारी सकाळी सफाई कामगारांनी साफसफाई केली. प्लास्टिक, कागद आणि पुठ्यांच्या खोक्यांचा कचरा उचलण्यासाठी तीन ट्रॅक्टर, एक घंटागाडी आणि एक कॉम्पॅक्टर वाहन वापरण्यात आले होते. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून परिचित आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. यावर्षी विठ्ठल मंदिरापासून काँग्रेस भवन, पऱ्याची आळी, मारुती जिल्ह्याबाहेरून आलेल्यांनी आपली दुकाने थाटली होती. यात्रेसह विविध सेलच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची आणि भक्तांचीही मोठी गर्दी झाली होती.

कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आलेल्या जिल्ह्याबाहेरच्या दुकानदारांनी आपल्या वस्तूंची आवरणे असलेली प्लास्टिकची वेस्टन, पुठ्यांचे खोके रस्त्यांवरच टाकून दिले होते. सकाळी या ठिकाणचे दुकानदार आपल्या दुकानासमोरचा जमलेला कचरा एका बाजूला करून ठेवत होते. रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा कचरा संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तब्बल ४० सफाई कामगार या मोहिमेत सहभागी झाले. ते रस्त्यावर ठिकठिकाणी जमलेला कचरा झाडूने काढून तो ट्रॅक्टर, घंटागाडीत, कॉम्पॅक्टर वाहनात भरत होते. ही वाहने जशी भरत होती, तशी कचरा डंपिंग ग्राऊंडच्या येथे टाकून परत येत होती. या मोहिमेत सुमारे ६ टन अतिरिक्त कचरा उचलावा लागला. इतरवेळी २२ टन कचरा जमा होतो, असे रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular