25.6 C
Ratnagiri
Monday, December 30, 2024

नितीश कुमार भारताचा नवा हीरो, शतक करत टीम इंडियाची लाज राखली

विराट कोहली, रोहित शर्मा यांच्याभोवती प्रामुख्याने भारतीय...

विलीनीकरणा अभावी कोकण रेल्वेची कामे रखडली

कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्याने प्रवाशांना...

शिवकालीन ठेवा संवर्धन करू – आ. किरण सामंत

तालुक्यातील येरडव ते अणुस्कुरा या सुमारे किमी...
HomeRajapurबारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी निवेदनाकडे पूर्णत: दुर्लक्ष

बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी निवेदनाकडे पूर्णत: दुर्लक्ष

आपल्याकडे देण्यासाठी ५००० ग्रामस्थांचे रिफायनरी विरोधात सह्यांचे निवेदन आम्ही खासदार विनायक राऊत यांचेकडे सुपुर्द केले होते.

रिफायनरी विरोधी संघटना बारसू सोलगाव पंचक्रोशी मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. संघटना अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, खजिनदार किसन बाणे यांनी हे पत्र ११ एप्रिलला दिले आहे.

लोकांचा विरोध असेल तर रिफायनरी जबरदस्तीने लादण्यात येणार नाही, अशी महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाची कायम भूमिका आहे, असे आम्ही मानतो. पण देवाचे गोठणे, शिवणे खु. सोलगाव, गोवळ, धोपेश्वर आणि आंबोळगाड या गावांचे रिफायनरी विरोधाचे मासिक सभांचे नव्हे तर ग्रामसभाचे ठराव झालेले आहेत. आपल्याकडे देण्यासाठी ५००० ग्रामस्थांचे रिफायनरी विरोधात सह्यांचे निवेदन आम्ही खासदार विनायक राऊत यांचेकडे सुपुर्द केले होते.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात आपण नाणार परिसरातील जनतेच्या विरोधाची दखल घेऊन विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द केला आहे. कोकणाची राखरांगोळी होऊ देणार नाही आणि कोकणाचे गॅस चेंबर होऊ देणार नाही अशी ग्वाही स्थानिकांना मुख्यमंत्री म्हणून आपण दिली होती, याची आठवण या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करुन देण्यात आली आहे.

शिवसेनेचे खासदार व पक्षाचे सचिव विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेकडून आमच्या परिसरात बारसु-सोलगाव धोपेश्वर येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित करण्याबाबत वक्तव्य करण्यात येत आहेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार उदय सामंत रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून विशेष प्रयत्नशील आहेत, असे समजते असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

१८ मार्च रोजी आझाद मैदानावर २००० ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले होते. तेव्हाही आपल्याला भेटण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. परन्तु, भेट तर दुरचीच गोष्ट, साधा कुठलाही निरोप आम्हाला आला नाही. आमच्या प्रामाणिक आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले,  असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे

RELATED ARTICLES

Most Popular