28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...
HomeChiplunनदीच्या किनाऱ्यावर उपसलेला गाळ तातडीने पूरबाधित क्षेत्राबाहेर टाकावा - जिल्हाधिकारी

नदीच्या किनाऱ्यावर उपसलेला गाळ तातडीने पूरबाधित क्षेत्राबाहेर टाकावा – जिल्हाधिकारी

वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ उपसण्याचे काम ५२ टक्के पूर्ण झाले आहे.

चिपळूण शहरामध्ये मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे वेगाने हालचाली करून नद्यांच्या गाळ उपसा करण्याचे योजिले आहे. त्याप्रमाणे तिथे दोन्ही नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. चिपळूण शहरात पुन्हा पुराचे संकट ओढवू नये यासाठी खास बाब म्हणून वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ उपसण्याचे काम ५२ टक्के पूर्ण झाले आहे. शिव नदीच्या किनाऱ्यावर उपसलेला गाळ तातडीने पूरबाधित क्षेत्राबाहेर टाकावा असे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी निर्देश दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी त्यांनी या कामाला गती देण्याचेही निर्देश दिले. पावसाच्या आधी सर्व गाळ उपशाचे काम पूर्णत्वास गेले पाहिजे. काही ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत तर काही ठिकाणी नदीतील गाळ उपसताना काही झाडे तोडावी लागली ही झाडे अद्यापही तेथेच पडलेली आहेत. ही झाडे तत्काळ उचलून इतरत्र नेण्यात यावी तसेच गाळ मागणी अर्जांना देखील तत्काळ मंजूरी प्रदान करावी असे ते म्हणाले.

चिपळूण शहरात मागील पावसाळ्यात अभूतपूर्व पुरस्थिती निर्माण झाली होती. याकरीता शासनाने विशेष बाब म्हणून नदीतील ७.८४ दशलक्ष घनमीटर गाळ काढण्यास परवानगी दिली होती. आत्तापर्यंत ४.१० दलघमी गाळ नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेवून सर्व संबंधित विभागांनी नेमून दिलेली कामे पूर्ण करावीत तसेच १ मे पासून नियंत्रण कक्ष सुरु करावेत असे त्यांनी सांगितले. पाटबंधारे विभागाने धरण क्षेत्र व लाभक्षेत्र यांचा समन्वय वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय अधिकारी चिपळूण प्रविण पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular