26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeMaharashtraपरीक्षा ऑफलाईनच कुलगुरू ठाम, महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून विशेष मागणी

परीक्षा ऑफलाईनच कुलगुरू ठाम, महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून विशेष मागणी

"कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरुंमध्ये मतांतर नाही, ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.

राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे विद्यापीठांकडून १ जून ते १५ जुलै दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. विद्यापीठांकडून आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची एकत्रित बैठक घेतली आणि त्यावर चर्चा केली.

बैठकी नंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरुंमध्ये मतांतर नाही, ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर ठेवण्यात आले  आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै दरम्यान घेतल्या जातील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.

सोमवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत राज्यभरातील विद्यापीठांच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा या ऑफलाईन पध्दतीने घेण्यावर एक मत झाले. ऑफलाईन परीक्षा घेताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून परीक्षा संदर्भात निर्णय घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियन कडून करण्यात आली आहे. या ऑफलाईन परीक्षा मे मध्ये घेण्याऐवजी जून जुलै महिन्यामध्ये घेण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आल्याने या ऑफलाईन परीक्षांचा निकाल ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाला लेटमार्क लागण्याची विद्यार्थ्यांना भीती असून इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular