27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...

रत्नागिरी पोलिसांनी दोन दिवसांत गोव्यातून चोरांच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. रत्नागिरी...
HomeSportsराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, स्मृती मंधानाने केली धमाकेदार फलंदाजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, स्मृती मंधानाने केली धमाकेदार फलंदाजी

भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रविवारी महिला टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ १८ षटकांत केवळ ९९ धावा करू शकला. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव यांनी सर्वाधिक २-२ विकेट घेतल्या. त्याचवेळी पाक संघाचे ३ फलंदाज धावबाद झाले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ११.४ षटकांत केवळ २ गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मंधानाने धमाकेदार फलंदाजी करताना अवघ्या ४२ चेंडूत ६३ धावा केल्या. तिच्या बॅटने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद दोन धावा केल्या.

शेफाली वर्माने ९ चेंडूत १६ आणि एस मेघनाने १६ चेंडूत १४ धावा केल्या. पाकिस्तानकडून तुबा हसन आणि ओमामा सोहेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताचा पुढचा सामना आता बार्बाडोसशी ३ ऑगस्टला होणार आहे. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात पाकिस्तानला पहिला धक्का बसला आणि इरम जावेद खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. तिला मेघना सिंगने बाद केले. यानंतर स्नेह राणाने ९ व्या षटकात पाकिस्तानला २ धक्के दिले.

प्रथम तीने कर्णधार बिस्माह मारूफला १७ धावांवर बाद केले. यानंतर मुनिबा राणाने ३२ धावा करून तिचा बळी घेतला. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात पराभवाने झाली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तान विरुद्धच्या गेल्या ४ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular