27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeInternationalजपानमध्ये पाळीव प्राण्यांसाठी अनोखा प्रयोग

जपानमध्ये पाळीव प्राण्यांसाठी अनोखा प्रयोग

या उपकरणाची संकल्पना आणणारे री उजावा म्हणतात – या वर्षी जपानमध्ये विक्रमी उष्णता निर्माण  होत आहे.

जपानमध्ये पाळीव प्राण्यांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी घालण्यायोग्य कपडे बनवणाऱ्या कंपनीने पंखे बनवले आहेत. टोकियो-आधारित कपड्यांच्या कंपनीने प्राण्यांसाठी खास कपडे तयार करण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांशी हात मिळवणी केली आहे. या कपड्यांमध्ये एक छोटा आणि हलका बॅटरी फॅन बसवण्यात आला आहे. जे उन्हाळ्यात प्राण्यांना थंड हवा देईल. आणि त्यांचे जगणे आणि वावरणे उकाडामुक्त होईल.

या उपकरणाची संकल्पना आणणारे री उजावा म्हणतात – या वर्षी जपानमध्ये विक्रमी उष्णता निर्माण  होत आहे. तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. आमचे पाळीव प्राणी एवढी मोठ्या प्रमाणातील  उष्णता सहन करू शकत नाहीत. त्यामध्ये त्यांनी स्वतचा अनुभव देखील कथन केला आहे. ते म्हणतात, कधीकधी मला उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी माझ्या कुत्र्याभोवती बर्फाचे पॅक ठेवावे लागतात. म्हणूनच मला वाटले की असे काहीतरी बनवावे ज्यामध्ये पंखा असेल. आणि मुक्या प्राण्यांना ते उपयुक्त ठरेल.

री उजावा यांनी पुढे सांगितले की, त्यांना आता या उपकरणासाठी १०० हून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. ते म्हणाले- लोकांना ते खूप पसंतीस पडत आहे. आम्ही ते ५ वेगवेगळ्या आकारात बनवले आहे. पाळीव प्राण्यांचे कपडे बनवणारी कंपनी त्यामध्ये पंखा देखील बनवत असून त्याची किंमत ५,९२४ रुपये इतकी आहे. आणि ही किंमत सर्वसामान्य जनतेस परवडणारी असल्याने मागणीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular