25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRajapurजिल्ह्यातील तीन जागांवर काँग्रेसचा दावा, राजापूरबाबत ठाम भूमिका

जिल्ह्यातील तीन जागांवर काँग्रेसचा दावा, राजापूरबाबत ठाम भूमिका

महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा प्रयत्न होता.

विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर-लांजा, दापोली, चिपळूण या तिन्ही विधानसभा जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीच्या जागावाटपात करण्यात येणार आहे. त्यामधील राजापूरच्या जागेवर काँग्रेस ठाम राहील, असे या बैठकीत सांगण्यात आले आहे. काँग्रेसची आढावा बैठक मीरा-भाईंदर येथे झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नाथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते सतेज (बंटी) पाटील, कोकण प्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष नाना गवांडे, भाई जगताप, हुसेन दलवाई आदी उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय परिस्थिती सर्वांपुढे मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत संभाव्य कोणत्या जागा काँग्रेस लढवणार आणि कोणत्या जागेबाबत आग्रही राहणार याचा जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. ते म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसची परंपरागत मते आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय दोन्ही मतदार संघात आला आहे. महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा प्रयत्न होता. राजापूर विधानसभा मतदार संघात चांगले काम केले होते.

सध्या या मतदार संघात स्थानिक उमेदवार मिळावा, अशी मागणी आहे. स्थानिक आमदारांविषयी मतदारांमध्ये चांगले मत नाही. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होऊ शकतो. त्याचबरोबर दापोली आणि चिपळूण मतदार संघात पक्षाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन जागा आपण लढवू शकतो. महाविकास आघाडी असल्यामुळे जागा वाटप करताना राजापूरच्या जागेवर ठाम राहिले पाहिजे, असे लाड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular