25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeRatnagiriकाँग्रेसच्या कुबड्या घेणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये : ना. सामंत

काँग्रेसच्या कुबड्या घेणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करु नये : ना. सामंत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये घेतलेल्या सभेत ना. उदय सामंत यांच्यावर टीका केली होती.

‘गद्दारांना गाडायचे आहे. या उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे. श्रद्धेय बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही. तशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू. पण आता ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. ही खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी’, असे जोरदार प्रत्युत्तर उद्योगमंत्री आणि पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिले आहे. ज्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत त्यांनी लाथ घालायची भाषा करू नये, असा टोलादेखील त्यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी रत्नागिरीमध्ये घेतलेल्या सभेत ना. उदय सामंत यांच्यावर टीका केली होती.

गद्दार असे संबोधित करत आगामी निवडणुकीत गद्दारांना गाडा, असे आवाहनदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सभेत बोलताना केले होते. उद्योगमंत्र्यांच्या व्यवसायाविषयी टीका केली होती. या टीकेला मंगळवारी एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत ना. उदय सामंत यांनी उत्तर दिले. आपण रत्नागिरीत ऐतिहासिक आणि धार्मिक कार्यक्रम केले. या दोन कार्यक्रमांच्यामध्ये एक मनोरंजनाचा कार्यक्रम करण्यात आला, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आणि विठ्ठलमूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याचा धार्मिक कार्यक्रम आपण केला. या कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. रत्नागिरीकरांचा मी आभारी आहे.

जे शिवाजी पार्कवर संभा घेत होते त्यांच्यावर आता रस्त्यावर, बोळात, चौकात सभा घेण्याची वेळ आली आहे. सोमवारची ठाकरेंची सभा अशीच बोळात घेण्यात आली. ही सभा म्हणजे टोमणे आणि कुटुंबाच्या बदनामीचा कार्यक्रम होता, अशी टीका ना. उदय सामंत यांनी केली. आपण गद्दारांच्या पेकाटात लाथ घालायला आलो आहोत, असे शिवसेना पक्षप्रम गुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र काँग्रेसच्या कुबड्या घेऊन नाचणाऱ्यांनी लाथ घालायची भाषा करू नये, असा जबरदस्त टोला उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत लगावला. गद्दारांना गाडायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या भूमिकेशी मी पूर्ण सहमत आहे, असे सांगताना ना. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना चोख उत्तर दिले.

बाळासाहेब सांगायचे की मी शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही. तशी वेळ आली तर आपण पक्ष बंद करू पण आता ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. हीच खरी गद्दारी आहे आणि ती गाडायला हवी, अशी टीका ना. उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना आपल्या वडिलोपार्जित बांधकामाच्या व्यवसायावरुन माझ्यावर टीका केली, असे सांगत ना. उदय सामंत म्हणाले की, एक गोष्ट चांगली आहे की आमचा व्यवसाय आहे हे त्यांनी मान्य केले. अर्थात त्यांनी आपल्या व्यवसायावर टीका केली असली तरी कोणताही व्यवसाय नसताना त्यांनी ६ मजली घर कसे बांधले? हा प्रश्न आपण आजपर्यंत कधीही विचारला नाही आणि यापुढेही विचारणार नाही, असे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular