26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRajapurराजापुरात शिंपल्याची कच वाहतूक करणारा टेम्पो पकडला

राजापुरात शिंपल्याची कच वाहतूक करणारा टेम्पो पकडला

खाडी पट्ट्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर शिंपल्याच्या कचचे उत्खनन होत असते.

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक राजापूर पोलिसांनी सोमवारी शिंपल्याच्या कचची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. याप्रकरणी राजापूर पोलिसंनी गुन्हा दाखल करुन संबंधितांना न्यायालयात हजर केले होते. मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यास राजापूर पोलिसांकडून नकार देण्यात आल्याने नेमकी भानगड काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. राजापूर पोलिसांनी आयशर टेंपो पकडला. मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर हात्तिवलेनजीक थांबवला. या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोतून शिंपल्यांच्या कचची वाहतूक सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या रॉयल्टीचा परवाना घेण्यात आला होता का नाही त्याबाबतची माहिती समजू शकली नाही.

दरम्यान, पोलीसांनी पकडलेला टेम्पो राजापूर पोलीस ठाण्यात आणला व नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करुन येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. राजापूर तालुक्याच्या खाडी पट्ट्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर शिंपल्याच्या कचचे उत्खनन होत असते. पोलिसांनी पकडलेला टेम्पो हा परजिल्ह्यातील असल्याचे समजते. कचची वाहतूक करताना ताब्यात घेतलेल्यांची नावे देण्यासही राजापूर पोलिसांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे हा टेम्पो नेमका कुणाचा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली – या गुन्ह्यामधील संशयित आरोपी टेम्पोचालक दत्ता बाळासाहेब राऊत (वय ४३ वर्षे रा. कागल बिरदेव वसाहत कागल, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं चे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन आयशर टेम्पो व १५ टन वजनं असलेला खाडीतील शिंपल्यांचा कच हस्तगत करण्यात आला आहे. राजापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक फुलचंद मेंगडे, सचिन वीर, पो.कॉ पंकज साटविलकर, पो. कॉ अनिल केसकर व चालक पो.कॉ. अर्शद मुल्ला या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular