31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून, सर्वसामान्यांची...
HomeChiplunआघाडी झाली तर ठीक अन्यथा स्वतंत्र लढण्यास काँग्रेस तयार : हुसेन दलवाई

आघाडी झाली तर ठीक अन्यथा स्वतंत्र लढण्यास काँग्रेस तयार : हुसेन दलवाई

आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील आघाडी झाली तर ठीक अन्यथा एकटे लढण्यासाठी देखील काँग्रेस तयार आहे. आगामी सर्व निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत, अशी स्पष्ट माहिती काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड़ माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण येथील जिल्हा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरातील ब्राम्हण सहायक संघाच्या सभागृहात शनिवारी सकाळीजिल्हा काँग्रेसची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, इब्राहीम दलवाई, भरत लब्धे, अशोक जाधव, नंदू थरवळ, अल्पेश मोरे, वासू मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, तसेच काँग्रेसच्या विविध सेल चे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस कमजोर आहे, हे आम्हाला मान्य आहे. काँग्रेस मजबूत करण्यासाठीच आम्ही बैठकीचे आयोजन केले होते. यापुढच्या काळात प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती गणनिहाय बूथकमि ट्या स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. काँग्रेसचे सातही सेल अॅक्टिव्ह केले जातील. तसेच येथील सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेस सातत्याने आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधत आहे. महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत देखील काँग्रेस आवाज उठवत राहील, असेही ते म्हणाले. आगामी निवडणूकीबाबत म हाविकास आघाडी करण्याचा निर्णय प्रदेशचा आहे. आगामी निवडणूका लढण्यास आम्ही सज्ज आहोत. आघाडी झाली तर ठीक अन्यथा आम्ही एकटे लढण्याची तयारी देखील करीत आहोत. आगामी सर्व निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाध्यक्ष अविनाश लाड म्हणाले, काँग्रेस सातत्याने विविध मुदद्यांवर आंदोलन करीत आहेत. महाम र्गासाठी पेन, पनवेल, रत्नागिरी येथे आंदोलन झाले. या आंदोलनावरून गेल्या सहा महिन्यात दोनदा गुन्हे दाखल झालेले आहेत. यापुढील काळातही जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करू. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, काँग्रेस पक्ष सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी लढा देत आहे. येथील शहर व तालुक्यात काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्यामुळे काँग्रेस निवडणूकीसाठी जोमाने तयारी करीत आहे. जनतेच्या संपर्कासाठी कार्यालय सुरू होत असल्याचे स्पष्ट करून या कार्यालयातुन सर्वसामान्य जनतेची कामे केली जातील.

RELATED ARTICLES

Most Popular