25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriआचारसंहितेपूर्वी १०४ जणांना नियुक्तीपत्र, कंत्राटी शिक्षक नियुक्त

आचारसंहितेपूर्वी १०४ जणांना नियुक्तीपत्र, कंत्राटी शिक्षक नियुक्त

जिल्ह्यात साधारणः ६०० च्या आसपास रिक्त जागा आहेत.

जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीवरून गेले काही दिवस सुरू असलेला गोंधळ लवकरच थांबणार आहे. या भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य द्या, अशा सूचना दोन दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने पहिल्या टप्प्यात आचारसंहितेपूर्वी १०४ जणांना नियुक्तीपत्र दिले आहे. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार आदेश काढला गेला.

कंत्राटी तत्त्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधीत शिक्षकाला शासनाकडून महिन्याला १५ हजार रुपये हे मानधन मिळणार आहे. वर्षाला १२ रजा असणार आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते. या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत २५ सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा, म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते. जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे. यामुळे हे वातावरण आणखी चिघळलं होतं. जिल्ह्यात साधारणः ६०० च्या आसपास रिक्त जागा आहेत. या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते.

परंतु, आलेल्या अर्जामध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे एक हजार अर्ज दाखल झाले होते. ही प्रक्रिया कशी राबवावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शन पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डीएड तसेच बीएड अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा. रिक्त पदे असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही, तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा, असे या पत्रात म्हटले आहे.

मात्र, काही ठिकाणी पोलिसपाटील व सरपंचानी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवाशी असल्याचा दाखला दिल्यान वादाचा प्रसंग निर्माण झाला. जि.फ. प्रशासनानेसुद्धा सावध भूमिका घेत ही प्रक्रिया संथगतीने करण्यात सुरुवात केली. शेवटी स्थानिक डीएड बेरोजगारांनी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांच्या मार्फत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी झालेल्या चर्चेत पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाला बोलावून दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करावी आणि स्थानिकांना त्यामध्ये संधी द्यावी, असा सांगितले होते. प्रशासनानेसुद्धा लगेच यावर कार्यवाही करत सोमवारी पहिल्या टप्प्यात १०४ जणांना नियुक्तीपत्र दिलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular