HomeChiplunशिजवलेला भात… त्यात चमचाही जात नाही! रेशनचा तांदुळ प्लास्टिकचा ? - शौकत...

शिजवलेला भात… त्यात चमचाही जात नाही! रेशनचा तांदुळ प्लास्टिकचा ? – शौकत मुकादम

माझ्या या पूर्वीच्या आंदोलनाची माहिती घ्या, अशा शब्दात शौकतभाई मुकादम यांनी आज स्पष्ठ शब्दात इशारा दिला.

हा शिजवलेला भात बघा, आत मध्ये चमचा पण जात नाही… तुम्ही खाल्ला तरी चालले आमचे काही म्हणणे असणार नाही…प्लास्टिक तांदळाची भेसळ आहे… जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे तो थांबला पाहिजे… अन्नभेसळ कडून तात्काळ अहवाल मागवा अन्यथा जनतेला महामार्ग रोखेन माझी. आंदोलने काय कशी असतात याची माहिती घ्या. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या विरोधात काही करेन असा आक्रमक इशारा शौकतभाई मुकादम यांनी गुरुवारी तहसीलदार कार्यालयाला दिला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्याकडे तालुक्यातील अनेक गावातील म हिलांनी रेशनवर मिळणाऱ्या तांदळाची व्यथा मांडली समोरची स्थिती बघून शौकतभाई मुकादम यांनी सहकाऱ्यांसह तहसीलदार कार्यालयात जाऊन जाब विचारला आणि आक्रमक इशाराही दिला. रेशनवर पुरवठा करण्यात येणाऱ्या तांदळात प्लास्टिक तांदळाची मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात आली आहे पाण्यावर तरंगणारे तांदूळ थेट शौकतभाई मुकादम यांच्याकडे आणून आपली व्यथा मांडली.

चमचा आत जात नाही – शौकतभाई मुकादम यांनी त्या तांदळाचा भात घरी केला त्या मध्ये चमचा टाकून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चमचा आत जात नव्हता. घट्ट चिकटलेला त्या तांदळाचा भाताचा टोप उचलला आणि तडक तहसीलदार कार्यालय गाठले. शिजवलेला भाताचा टोप तडक नायब तहसीलदार याच्यापुढे ठेवला. तहसीलदार नसल्याने या साऱ्याला तोंड नायब तहसीलदारांना द्यावे लागले. हा भात बघा आणि या मध्ये चमचा टाकून काढून दाखवा असे खुले आवाहन त्यानी दिले.

तुम्ही खाणार तर खा! – हा भात आम्ही कोण खाणार नाही पण तुम्ही खाणार असला तर आमचे. काही म्हणणे नाही मात्र हा प्रकार जनतेच्या जीवाशी खेळण्याचा आहे एवढे लक्षात ठेवा हे प्लास्टील तांदूळ आणले आहेत तेही बघा, आणि मग काय ते ठरवा असे स्पष्ट बजावले. या मध्ये रेशनदुकांदार अथवा तुमचा सबंध नाही मात्र आता तक्रार आल्या नंतर तात्काळ अन्नभेसळ कडून तपासणी करा आणि तो अहवाल जाहीर करा. तो पर्यंत वाटप थांबवा अशी मागणी म .कादम यांनी केली. शंभर ग्राम तांदळात किमान वीस ग्राम प्लास्टील तांदूळ असल्याचा आरोप शौकतभाई मुकादम यांनी केला आहे.

तर मग महामार्ग रोखेन! – मला माहित आहे यामध्ये तुमचा दोष नाही मात्र आता तात्काळ तपासणी अहवाल आला नाही तर मग याद राखा. मी गप्प बसणार नाही. जनतेला घेऊन महामार्गावर उत्तरेंन. मग बघा काय काय घडते आहे. माझ्या या पूर्वीच्या आंदोलनाची माहिती घ्या, अशा शब्दात शौकतभाई मुकादम यांनी आज स्पष्ठ शब्दात इशारा दिला. शौकतभाई मुकादम यांच्यासोबत अल्पसंख्याक उपतालुका अध्यक्ष खालिद पटाईत, क्लबसते माजी सरपंच चंद्रकांत सावंत, सरपंच विकास गमरे, अंकुश शिगवण, विवेक महाडिक, दशरथ जाधव, बशीरभाई चिकटे, दिनेश शिंदे, अजमल पटेल रुपेश इंगवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular