23 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeMaharashtraस्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ७ रूपयांनी महागला

स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ७ रूपयांनी महागला

पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ जाहीर केलीय, व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचा दर ७ रुपयांनी वाढवला आहे. व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत १,७७३ रुपयांवरून १,७८० इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलेंडर दरात कपात झाली होती. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत १७३३.५० रुपये आहे.

जून महिन्यात हे दर १७२५ रुपये होते. कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅसची किंमत १८९५.५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत १९४५ रुपये होती. कोलकात्यामध्ये जून महिन्यात १८७५.५० रुपये तर चेन्नईमध्ये किंमत १९३७ रुपये इतकी होती. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत घरगुती गॅसची किंमत ११०२ रुपये आहे. दरम्यान यावर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

जूनपासूनच घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापरासाठी असणाऱ्या एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी ६ जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत १०५३ रुपये होती, त्यात ५० रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर ११०३ रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular