31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...
HomeSportsआयपीएलवर कोरोनाचे सावट

आयपीएलवर कोरोनाचे सावट

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनेच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, याआधी वानखेडेवरील १० कर्मचार्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले होते, आता आणखी दोन ग्राउट स्टाफ आणि एका प्लंबरला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मुंबईत सुरु होणार्या आयपीएल २०२१च्या सामन्यावर कोरोनाचे वाढत चालले संकट दिसून येत आहे. या स्पर्धेची सुरूवात ९ एप्रिल रोजी होणार असून पहिली लढत चेन्नई मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये  होणार आहे. तर दुसरी लढत मुंबईतील वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयोजली आहे. चेन्नई आणि दिल्लीत यांच्यात होणाऱ्या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यावर कोरोना संकटाचे ढग पसरलेले आहेत. या मैदानावरील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या शिवाय तेथील एका प्लंबरला देखील कोरोना झाला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनेच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, याआधी वानखेडेवरील १० कर्मचार्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले होते, आता आणखी दोन ग्राउट स्टाफ आणि एका प्लंबरला कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वानखेडे स्टेडियममध्ये एक क्लब हाऊस आहे, आयपीएल संपेपर्यंत या सर्व कर्मचार्यांची व्यवस्था तिथेच केलेली आहे. वानखेडे मैदानावर या वर्षी आयपीएलमधील १० सामने होणार आहेत. पण मागील काही दिवसामध्ये मैदानावर कार्यरत असणारे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआयचे थोडे टेन्शन वाढलेले दिसत आहे. कालच महाराष्ट्र सरकारने निर्बंधित अटींसह सामने खेळवण्यास परवानगी दिली होती.  महाराष्ट्रात आणि मुंबईत देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आहे. संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. मुंबईमध्ये रात्री आठ वाजल्यानंतर जमावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचवेळी रात्री आठ वाजल्यानंतर आयपीएलचा सुरु असलेला सराव बंद करण्यत येणार का असा सवाल काही जणांना पडला आहे. परंतु, आता महाराष्ट्राच्या सरकारने देखील याबाबत आपले मत मांडले आहे व याबाबतचा स्पष्ट खुलासा बीसीसीआयचे अधिकारी श्रीरंग घोलप यांनी केला आहे. घोलप यांनी सांगितले की, आयपीएलचे काही संघ सध्याच्या घडीला मुंबईमध्ये सराव करत आहेत. आयपीएलचे काही सामने हे रात्री खेळवण्यात येणार असल्याने आयपीएलच्या सराव करणाऱ्या संघांना दोन सत्रांमध्ये सराव करण्याची परवानगी दिली गेलेली आहे. आयपीएलचे खेळाडू दुपारी ४ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत सराव करू शकतात. तसेच सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत खेळाडूंना सराव करण्याची सवलत देण्यात आली आहे.

IPL2021

देशातील सर्वाधिक संक्रमित कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र आणि मुंबईतचं नोंद असल्याने अशा स्थितीत वानखेडेवर आयपीएलचे सामने भरविले जातील का याबाबत चर्चांना ऊत आला आहे. यासंदर्भात राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. परंतु, तूर्तास तरी राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील वानखेडे मैदानावर आयपीएलचे सामने खेळविण्यास हिरवा कंदील दिला आहे. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी या बद्दलची माहिती दिली. कोरोना संदर्भातील नवे नियम राज्य सरकारने एक दिवस आधी जाहीर केले असून, ही परवानगी अनेक अटींसह देण्यात आली आहे. सामने हे प्रेक्षकाविना खेळविले जातील, मैदानावर एकही प्रेक्षकांला प्रवेश दिला जाणार नाही. जे आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना एकाचं ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागले. कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्दी होता कामा नये या अटीं-शर्थीवर परवानगी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular